दैनिक राशीभविष्य : १० डिसेंबर २०२१; ‘या’ राशीच्या लोकांना पर्सनल सेक्रेटरीकडून बाहेरगावी फिरायला जाण्याची ऑफर येऊ शकते. पर्यटनाचा प्लान आखू शकता.

    मेष (Aries) :

    मन प्रसन्न राहिल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात यशस्वी व्हाल.
    शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

    वृषभ (Taurus) :

    कौटुंबिक जीवनात चढ उतार राहिल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. प्रतिष्ठित लोकांशी संबंध प्रस्थापित होतील.
    शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

    मिथुन (Gemini) :

    कामात यशस्वी व्हाल. व्यवसाय करण्याच्या इच्छेला मूर्त रुप देऊ शकता. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
    शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

    कर्क (Cancer) :

    दिवसाची प्रसन्न सुरुवात होईल. व्यापारी वर्गाला फायदा होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
    शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1

    सिंह (Leo) :

    दिवसभर तुम्हाला उत्साह जाणवेल. कष्टाचं फल मिळले. शुभ कार्यात सहभागी होण्याचा योग आहे. ज्येष्ठांचा आदर राखाल.
    शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

    कन्या (Virgo) :

    भाग्य तुमच्यासोबत आहे. विद्यार्थी स्पर्धेा परीक्षांमध्ये यशस्वी ठरतील. मित्राची भेट होईल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल.
    शुभ रंग आणि अंक : लाल, 7

    तूळ (Libra) :

    नोकरीत यशस्वी व्हाल. कौटुंबिक वाद संपतील. शत्रुवर वरचढ ठराल. भाग्य तुमच्यासोबत आहे.
    शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

    वृश्चिक (Scorpio) :

    आजचा दिवस अविस्मरणीय ठरेल. गोड स्वभावामुळे कामात यशस्वी व्हाल. हुशारीच्या जोरावर कामं पूर्ण कराल. वरिष्ठांकडून कौतुक होईल.
    शुभ रंग आणि अंक : निळा, 8

    धनु (Sagittarius) :

    कामाच्या ठिकाणी असलेल्या अडचणी निकाली निघतील. सर्व कामात यशस्वी व्हाल. इतरांचा सल्ला घेणं लाभदायक ठरेल.
    शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

    मकर (Capricorn) :

    दिवस कोणत्याही विघ्नाशिवाय चांगला जाईल. आव्हानात्मक स्थितीचा सामना करावा लागू शकतो, अशा परिस्थितीत कुटुंबिय धीर देतील. धीर सोडू नका. परिस्थितीचा न खचता सामना करा.
    शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

    कुंभ (Aquarius) :

    भाग्याची साथ मिळेल. कामात तुम्ही तुमची छाप सोडाल. संवादाच्या जोरावर तुम्ही यशाचं शिखर गाठाल. चांगली बातमी मिळेल. पर्सनल सेक्रेटरीकडून बाहेरगावी फिरायला जाण्याची ऑफर येऊ शकते. पर्यटनाचा प्लान आखू शकता.
    शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

    मीन (Pisces) :

    तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. शुभ कार्यात सहभागी व्हाल. स्वत:कडे दुसऱ्यांना आकर्षित कराल. कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हाल.
    शुभ रंग आणि अंक : नारंगी, 7