दैनिक राशीभविष्य : ३१ डिसेंबर २०२१ ; ‘या’ राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा दिवस लाभदायी ठरेल फक्त तुमच्या तोंडावर गोड बोलणारे आणि मागे तुमचे अहीत चिंतणाऱ्या घटकापासून सावध राहा

  मेष (Aries) :

  निश्चयाने काम केल्यास मेहनत सार्थकी लागेल. घरात काही अनपेक्षित घटना घडतील. तुमच्या डोक्यात एकाचवेळी अनेक योजना असतील. कुरघोडी करायचा प्रयत्न झाल्यास शांत राहून निर्णय घ्या. राशीचे लोक या दिवशी यश मिळवू शकतात. अकराव्या स्थानी असलेला चंद्र तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकतो. या राशीच्या लोकांना या दिवशी मोठ्या भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. जर तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज घरातील लोकांशी बोलणे चांगले राहील. आज ९२% नशिबाची साथ आहे. शिवजींची पूजा करा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, ५

  वृषभ (Taurus) :

  नियोजित गोष्टी अचूकपणे पार पडतील. बऱ्याच काळापासून असलेली एखादी अडचण सुटेल. मित्रांशी संबंध सुधारतील. नव्या लोकांना भेटाल. कार्यालयात स्वत:वर नियंत्रण ठेवा. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. या दिवशी राशीचा चंद्र तुमच्या दहाव्या स्थानी राहील, त्यामुळे तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात योग्य बदल पाहायला मिळतील. जर एखाद्या सहकाऱ्याशी मतभेदाची स्थिती असेल तर त्यात सुधारणाही होऊ शकते. या दिवशी या राशीचे व्यापारी कर्मचार्‍यांना खूश करण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही सरप्राईज गिफ्ट देऊ शकतात, ज्यामुळे कामाच्या वातावरणात चांगले बदल दिसून येतील. आज ८४% नशिबाची साथ आहे. १० वर्षांपेक्षा लहान मुलींना भेटवस्तू द्या.
  आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, ६

  मिथुन (Gemini) :

  प्रिय व्यक्तींबद्दल सुवार्ता ऐकायला मिळू शकतात. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचा विचार करा. कामात आत्मविश्वास असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. लव लाईफमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. चंद्र आज तुमच्या नवव्या स्थानी असेल, त्यामुळे सासरच्या लोकांशी तुमचे संबंध सुधारतील. या राशीच्या काही लोकांच्या मनात संन्यास घेण्याचा विचार येऊ शकतो. या राशीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अपेक्षित परिणाम मिळू शकतात. सामाजिक स्तरावर प्रतिष्ठा वाढेल. आज ८६% नशिबाची साथ आहे. बुध ग्रहाच्या बीज मंत्राचा जप करा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, ३

  कर्क (Cancer) :

  नियोजित गोष्टींमध्ये काही बदल करावे लागतील. इतरांनी सांगितलेल्या गोष्टी बारकाईने ऐका, आपणे म्हणजे इतरांना नीट समाजावून सांगा. नव्या भेटीगाठी होतील. आज चंद्र तुमच्या आठव्या स्थानी असल्याने आरोग्यासंबंधी समस्या होऊ शकतात. या राशीच्या लोकांना या दिवशी अचानक धनलाभही होऊ शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या. जर तुम्ही असाध्य आजाराने त्रस्त असाल तर या दिवशी तुम्ही स्वतःची विशेष काळजी घ्यावी. आज ६६% नशिबाची साथ आहे. आईचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, २

  सिंह (Leo) :

  कामाचे काटेकोर नियोजन करा. स्वत:च्या बुद्धीची छाप इतरांवर पाडाल. अनेक काळापासून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कोणत्यातरी प्रकारच्या विचारांमध्ये गुंतून जाल. कामात मन लागणार नाही. चंद्र आज तुमच्या सातव्या स्थानी विराजमान असल्याने वैवाहिक जीवनात चांगले बदल घडू शकतात. या दिवशी या राशीचे काही लोक जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवू शकतात. दैनंदिन व्यवसाय करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ ठरू शकतो. आज ८२% नशिबाची साथ आहे. बजरंगाचे नामस्मरण करा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, ७

  कन्या (Virgo) :

  आर्थिक आवक वाढल्यामुळे भावनिकदृष्ट्या संतुलित राहाल. नोकरी किंवा धंद्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. एखादा अडथळा आल्यास घाबरून जाऊ नका. ज्येष्ठांचा सल्ला घ्या आणि शांतपणे मार्ग काढा. यश नक्कीच पदरात पडेल. घर आणि जमीन जुमल्याच्या व्यवहारात यश मिळेल. चंद्र आज तुमच्या सहाव्या स्थानी विराजमान होईल. या दिवशी या राशीच्या लोकांच्या मनात अनावश्यक काळजी घर करू शकते. जर एखाद्याकडून कर्ज घेतले असेल तर तो या कालावधीत कर्ज परत मागू शकतात. जोडीदार आज खऱ्या मित्राप्रमाणे तुमची साथ देईल, ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल. सासरच्या लोकांकडून फायदा होऊ शकतो. आज ७०% नशिबाची साथ आहे. बहिणीला तिच्या आवडीचा आशीर्वाद द्या.
  आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, ३

  तुळ (Libra) :

  पैसा गुंतवण्यासाठी योग्य वेळ. आजचा दिवस खूप धावपळीचा असेल. मात्र, कामं ठरल्यानुसार पार पडतील. योग्य सहकार्य मिळेल. दिवस धावपळीचा असला तरी फलदायी ठरेल. व्यवसाय, पैसा आणि कायदेशीर प्रकरणे मार्गी लावण्यासाठी उत्तम दिवस. नवे मित्र भेटतील, नव्या गोष्टी शिकाल. या दिवशी या राशीच्या लोकांना मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तूळ राशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधांमध्येही भरभराट होईल. जे विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत त्यांना या दिवशी शाळेत यश मिळू शकते. तसेच, हृदयाशी संबंधित आजारांनी त्रस्त असलेल्या या राशीच्या लोकांनी या दिवशी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. आज ८२% नशिबाची साथ आहे. शुक्र ग्रहाच्या ‘ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः’ या बीज मंत्राचा जप करा
  आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, ६

  वृश्चिक (Scorpio) :

  आज तुमच्या मनात अनेक योजना असतील. वेळेचे योग्य नियोजन केले तर यशस्वी व्हाल. पैसे कमावण्याचा विचार करार. आजचा दिवस चांगल्या लोकांसोबत घालवाल. एखादी नवीन गोष्ट करण्यापूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्या. रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील.लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळेल. भाऊ आणि मित्रांकडून सहयोग मिळेल. चंद्र आज तुमच्या चतुर्थ स्थानी विराजमान होईल, हे सुखाचे स्थान म्हणूनही ओळखले जाते.. या स्थानी चंद्राची उपस्थिती कौटुंबिक सुखात वृद्धी करू शकते. काही लोकांना या दिवशी स्थावर मालमत्तेचा लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला कोणत्याही न्यायालयीन खटल्याबद्दल काळजी वाटत असेल तर आज त्याचे निराकरण देखील होण्याची शक्यता आहे. आज ८६% नशिबाची साथ आहे. ॐ अंगारकाय नमः या मंत्राचा ११ वेळा जप करा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, ७

  धनु (Sagittarius) :

  पैसा गुंतवण्यासाठी उत्तम दिवस. मनाचा आवाज ऐकून अनेक निर्णय घ्याल. हे निर्णय यशस्वीही ठरतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. नवे काम आणि व्यवहार समोर येतील. महत्त्वपूर्ण मिटींग आणि काम करण्यासाठी दिवस चांगला आहे. या दिवशी राशीचा चंद्र तुमच्या तिसऱ्या स्थानी असेल, त्यामुळे या राशीच्या काही लोकांना या दिवशी कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. या दिवशी सामाजिक स्तरावर कोणीतरी दुखावले जाईल असे वर्तन करणे टाळावे. लहान भाऊ आणि बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात. आज ८४% नशिबाची साथ आहे. गुरुच्या बीज मंत्राचा जप करा. वर्षाचा शेवटचा दिवस लाभदायी ठरेल. वर्षभरात जे मिळविता आले नाही, ती गोष्ट आज सहजपणे मिळेल. फक्त तुमच्या तोंडावर गोड बोलणारे आणि मागे तुमचे अहीत चिंतणाऱ्या घटकापासून सावध राहा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, ४

  मकर (Capricorn) :

  एखादा मित्र किंवा मैत्रिणीसोबत भागीदारी करून पैसा मिळेल. जोडीदार किंवा कुटुंबीयांविषयी असलेल्या चिंता दूर होण्याची शक्यता. नोकरी आणि व्यवसायात अचानक निर्णय घ्यावे लागतील. एखादी व्यक्ती आकर्षित होण्याची शक्यता. चंद्र या दिवशी तुमच्या दुसऱ्या स्थानी असेल, हे वाणी आणि आर्थिक स्थान म्हणूनही ओळखले जाते. या स्थानी चंद्राची उपस्थिती तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. चंद्राच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत चांगले परिणाम मिळतील. आज हुशारीने गुंतवणूक केल्यास भविष्यात फायदा होऊ शकतो. आज ८६% नशिबाची साथ आहे. भगवान शिवाची स्तुती करा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, १

  कुंभ (Aquarius) :

  नवीन जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता. सकारात्मक विचार कराल. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या लोकांची भेट होण्याची शक्यता. संपूर्ण दिवस चांगला जाईल. पार्टनरकडून सरप्राईज मिळेल. आज तुम्ही स्वत: मानसिकदृष्ट्या सशक्त असाल. मानसिक कणखरतेमुळे तुम्ही कठीण निर्णय सहज घेऊ शकता. तुमच्या स्वभावात नम्रता असेल, त्यामुळे आज सामाजिक स्तरावरही तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. या राशीच्या लोकांना भागीदारी व्यवसायात फायदा होऊ शकतो. आज ९०% नशिबाची साथ आहे. असत्य बोलणे टाळा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, ९

  मीन (Pisces) :

  कामं ठरवल्यानुसार पार पडतील. बऱ्याच काळापासून प्रतिक्षेत असलेली संधी मिळेल. आळस आणि नैराश्य झटकून प्रयत्न कराल तर यशस्वी ठराल. चंद्र या दिवशी तुमच्या बाराव्या स्थानी असेल, त्यामुळे लोकांना भेटण्याऐवजी एकांतात वेळ घालवण्याचा आनंद घ्याल. आज तुम्ही तुमच्यातील दोष ओळखून ते दूर करण्याचा प्रयत्न करू शकता. या राशीच्या लोकांना आर्थिक बाजूने सावध राहावे लागेल. आज अनावश्यक खर्च टाळा. आज ७६% नशिबाची साथ आहे. शिक्षकांचे आशीर्वाद घ्या.
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, ८