एकाच कॉलेजला असल्याने दोघांची ओळख झाली. एकाच भागात राहत असल्याने घरी जाणे येते होते. त्यामुळे ते एकाच गाडीवर कॉलेजला जायचे. दरम्यान त्यांनी आपण शिक्षण घेतल्यानंतर लग्न करणार असल्याचे घरच्यांना सांगितले. शिक्षणानंतर दोघेही नोकरीवर लागले. सतीश शासकीय नोकरीत असून युवती खासगी कंपनीत आहे. दोघेही अभियंता आहेत.
नागपूर (Nagpur) : महाविद्यालयीन मित्राने प्रेमात दगा दिल्याने निराश झालेल्या युवतीन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या युवतीची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
सागर सतिश सदाफल (३०) आणि २८ वर्षीय युवती एकाच कॉलेजध्ये असल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. नोकरीनंतर विवाह करण्याचे दोघांनी निश्चित केले होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीवर लागल्यानंतर त्यांच्यात दुरावा आला. सतीशने गुपचूप दुसऱ्या युवतीसोबत साक्षगंध उरकले. ही बाब समजल्यानंतर निराश झालेल्या युवतीने झोपेच्या गोळ्या खाऊन स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला.
एकाच कॉलेजला असल्याने दोघांची ओळख झाली. एकाच भागात राहत असल्याने घरी जाणे येते होते. त्यामुळे ते एकाच गाडीवर कॉलेजला जायचे. दरम्यान त्यांनी आपण शिक्षण घेतल्यानंतर लग्न करणार असल्याचे घरच्यांना सांगितले. शिक्षणानंतर दोघेही नोकरीवर लागले. सतीश शासकीय नोकरीत असून युवती खासगी कंपनीत आहे. दोघेही अभियंता आहेत.
आत्महत्या प्रयत्नाचे प्रकरण बेलतरोडी पोलिसांकडे गेले. पोलिसांनी ३० नोव्हेंबर रोजी मेडिकलमध्ये जाऊन युवतीचे बयाण नोंदविले. प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याचे युवतीने सांगितले.