
अहमदनगर महाकरंडक २०२२ (Ahmadnagar Mahakarandak 2022) - रंगभूमीची रणभूमी ‘उत्सव रंगभूमीचा, नवरसांचा’ ही स्पर्धा१२ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
राज्यातील हौशी कलावंतांच्या नाट्याविष्काराला प्रोत्साहन देणारी, मराठी-हिंदी कलाकारांच्या उपस्थितीत पार पडणारी, भव्यदिव्य पारितोषिकं असलेल्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या एकांकिका(One Act Play Competition) स्पर्धेसाठी जानेवारीचा(Ahmadnagar Karandak Competition In January) मुहूर्त काढण्यात आला आहे. अहमदनगर महाकरंडक २०२२(Ahmadnagar Mahakarandak) – रंगभूमीची रणभूमी ‘उत्सव रंगभूमीचा, नवरसांचा’ ही स्पर्धा१२ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
अर्ज कुठे भराल ?
www.mahakarandak.com या संकेतस्थळावर २० डिसेंबरपर्यंत प्रवेश अर्ज भरायचा आहे.अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एंटरटेन्मेंट आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित आणि श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा झी-मराठीच्या सहयोगानं अहमदनगर शहरातील माऊली सभागृहात पार पडणार आहे. राज्यातील हौशी नाट्य संस्था आणि महाविद्यालयांसाठी ही स्पर्धा खुली असेल अशी माहिती अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली आहे.
निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर, भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे, सिद्धार्थ जाधव, मंगेश कुलकर्णी, श्रीरंग गोडबोले, सोनाली कुलकर्णी आदी सेलिब्रिटीज या स्पर्धेला आतापर्यंत पाहुणे म्हणून लाभले आहेत. केदार शिंदे, अमित भंडारी, सुजय डहाके, विजय पाटकर, किरण यज्ञोपवित, प्रवीण तरडे, हेमांगी कवी, सुनील बर्वे, अश्विन पाटील, राजन ताम्हाणे, विकास कदम, मुक्ता बर्वे, विनोद लवेकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिलं आहे.