दत्त साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रेणिक पाटील यांचे निधन

शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन श्रेणीक पाटील (रा. चांद-शिरदवाड, ता.निपाणी) यांचे निधन झाले. ते ६४ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने दत्त साखर कारखाना परिसरासह महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात हळहळ व्यक्त होत आहे.

    जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे (Datta Sugar Factory) व्हॉईस चेअरमन श्रेणीक पाटील (Shrenik Patil) (रा. चांद-शिरदवाड, ता.निपाणी) यांचे निधन झाले. ते ६४ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने दत्त साखर कारखाना परिसरासह महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात हळहळ व्यक्त होत आहे.

    निधनानंतर दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दुःख व्यक्त करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी साखर कारखान्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व सभासद यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. कै. पाटील यांनी कर्नाटक सरकारच्या भू-लवाद मंडळ सदस्य यासह सहकार क्षेत्रातील विविध संस्था पातळीवर त्यांनी काम केले आहे.

    दत्त साखर कारखान्याचे संचालक ते जुलै २०१९ पासून व्हाईस चेअरमन या पदावर त्यांनी काम करून शेतकरी व कामगार यांच्याकरिता मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.