रहाटणी सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्ताजी थोरात तर शंकर थोरात उपाध्यक्षपदी

संस्थेच्या सभासदांना विविध शासकीय योजनाचा लाभ मिळवून देण्याबरोबरच सर्व संचालकांना विश्वासात घेऊन संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. 

  वडूज : रहाटणी (ता.खटाव) येथील विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्ताजी जोतीराम थोरात तर उपाध्यक्षपदी शंकर मारुती थोरात यांची बिनविरोध निवड झाली.

  पंधरा दिवसांपूर्वी सोसायटीच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली होती. यामध्ये दत्ताजी थोरात, शंकर थोरात, सुनिल चन्ने, दिलिप थोरात, बापूराव थोरात, प्रकाश निकम, स्वप्निल निकम, साैरभ थोरात, जगन्नाथ जरग, तात्याबा गायकवाड, जगन्नाथ कांबळे, जयश्री थोरात जनाबाई जाधव यांची संचालकपदी वर्णी लागली होती.

  निवडणूक निर्णय अधिकारी शंकर सावंत यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी बोलावलेल्या सभेत दत्ताजी थोरात व शंकर थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

  निवडीनंतर बोलताना दत्ताजी थोरात म्हणाले की, संस्थेच्या सभासदांना विविध शासकीय योजनाचा लाभ मिळवून देण्याबरोबरच सर्व संचालकांना विश्वासात घेऊन संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

  नूतन पदाधिकाऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील खासदार श्रीनिवास पाटील, जितेंद्र पवार, माजी उपसभापती जोतिराम थोरात, युवा नेते संभाजीराव थोरात रामराव थोरात आदींसह सभासद व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शंकर सावंत यांनी तर सचिव अनिल भगत यांनी सहाययक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.