
मुंबई : मुंबई उपनगरातील कांदिवली पश्चिम एकता नगर येथे सार्वजनिक शौचालय स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पोलीस, महापालिका आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिम एकता नगरमध्ये महापालिकेने ६ महिन्यांपूर्वी शौचालय बांधले होते.शौचालयाची टाकी तुडुंब भरल्याने कंत्राटदाराने ३ जणांना टाकी स्वच्छ करण्यासाठी बोलावले. तिघेही टाकीच्या आत गेले तर एक जण बाहेर उभे होते. गॅसमुळे गुदमरून मृत्यू झाला. आतापर्यंत तिघांचीही नावे समजलेली नाहीत.