
मिरज शहर पोलिस ठाण्याच्या आवारात मध्यरात्रीच्या सुमारास सर्फराज जमखंडीकर (वय २६, रा. गुरुवार पेठ, मिरज) या युवकाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. सदर जखमी युवकाला मिरज पोलिसांनी उपचारासाठी ताातडीने सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना त्याचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला.
मिरज : मिरज शहर पोलिस ठाण्याच्या आवारात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सर्फराज जमखंडीकर (वय २६, रा. गुरुवार पेठ, मिरज) या युवकाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. सदर जखमी युवकाला मिरज पोलिसांनी उपचारासाठी ताातडीने सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना त्याचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला.
या युवकाला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना एक पोलिस कर्मचाऱ्याला किरकोळ इजा झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, सर्फराज जमखंडीकर हा मंगळवारी मध्यरात्री मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये आला होता. काही तरुणाबरोबर त्याचा वाद झाल्याने त्या तरुणांना तात्काळ अटक करा, असे सांगून तो आरडाओरडा करू लागला. तो तरुण नशेत असल्याने पोलिसांनी त्याच्यासोबत घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी कोणीच मिळून आले नाही. त्यामुळे सदर पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये थांबण्यास सांगितले. मात्र, तो आरडाओरडा करून दंगा करू लागला व बाहेर जाऊन त्याने पोलिस स्टेशनच्या आवारात सोबत आणलेल्या बाटलीतून पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेत सोबत आणलेल्या काडीपेटीने पेटवून घेतले. यावेळी पोलिस कॉन्स्टेबल वाघमोडे आणि कोळेकर यानी त्यास परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने त्याला उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यासंदर्भात पोलिसांनी बुधवारी त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना सर्फराज जमखंडीकरचा मृत्यू झाला. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे हे करत आहेत.