३१ डिसेंबरच्या पार्ट्यांवर नागपुरात बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, दारुड्यांच्या आनंदावर विरजण

  नागपूर (Nagpur) : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी चांगलीच तयारी केली होती. ३१ डिसेंबर म्हटले तर मद्यपींसाठी जणू पर्वणीच असते. मात्र, नागपुरात दारू पिण्यासाठी परवाना लागणार होता. आता हा आदेश फिरवून ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांवर जिल्हा प्रशासनाने बंदीचे आदेश काढले आहे. यामुळे नागपूरकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

  कोरोना आणि ओमिक्रॉनचा धोका पाहता जिल्हाधिकारी विमला आर. यांनी हे आदेश (Collectors order) काढले आहे. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत पार्टी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशानंतरही पार्ट्यांचे आयोजन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

  विधानपरिषदेचं आजच्या दिवसाचं कामकाज स्थगितविधानपरिषदेचं आजच्या दिवसाचं कामकाज स्थगितराज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अवैध मद्य विक्री, साठवणूक करणाऱ्यांवर राहणार नजरबेकायदा मद्य साठवणूक आणि विक्री होण्याची शक्यता लक्षात घेत भरारी पथकांमार्फत वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

  मुंबईत ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर निर्बंधमुंबईत ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर निर्बंधख्रिसमस आणि न्यू इयर पार्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC) नवी नियमावली लागू केली आहे.

  मुंबईत थर्टी फर्स्ट पार्ट्यांवर बंदी; नियमभंग झाल्यास कारवाई!मुंबईत थर्टी फर्स्ट पार्ट्यांवर बंदी; नियमभंग झाल्यास कारवाई!थर्टी फर्स्टला होणाऱ्या पार्ट्यांवर मुंबई महानगरपालिकेने बंदी घातली आहे. तसे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी मध्यरात्री प्रसिध्द केले.

  दारू पिण्यासाठी ऑनलाइन परवाना कसा काढाल?दारू पिण्यासाठी ऑनलाइन परवाना कसा काढाल?२१ वर्ष पूर्ण होताच लग्न करण्याची मुभा असते. मग, या वयात मद्यपान करण्याची मुभा का नसते? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल. पण, त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही नियम घालून दिले आहेत.

  ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या स्वागताची पाच रुपयांत एक दिवसाचा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून दिला जाणार होता. यासाठी ऑनलाइन आणि ऑनलाइन अशी व्यवस्था करण्यात आली होती. मद्याच्या दुकानात (Liquor) ऑनलाइन परवाना मिळणार होता. तसेच पार्टी करायची असेल तर तीन ते तीस हजार शुल्क आकारून परवाना घ्यावा लागणार होता. परवाना शिवाय मद्य खरेदी किंवा पार्टी आयोजित केली तर कारवाई केली जाणार होती.