महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बहुसदसीय प्रभागरचना करण्याचा मार्ग मोकळा

विधानसभेत बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीबाबतच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली.

    मुंबई : विधानसभेत बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीबाबतच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यानी यावेळी बोलताना या व्यवस्थेबाबत १९९९ पासून अनेकवेळा एक सदस्यीय आणि बहुसदस्यीय व्यवस्था सुधारणा विधेयके मांडण्यात आल्याचे सांगितले.

    ते म्हणाले की, बहुसदस्यीय प्रभाग पद्दतीने नागरिकाना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी अधिकचे पर्याय उपलब्ध होत असल्याने ही पध्दत करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या कायद्याच्या दुरूस्तीला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यानी विरोध असल्याचे सांगितले. केवळ राजकीय सोय म्हणून अशाप्रकारचे वारंवार बदल करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. अश्या प्रकारच्या दुसरूस्तीमुळे नागरीकांना कोणताही विशेष फायदा होणार नसल्याचे सांगत ते म्हणाले की, केवळ राजकीय सोय म्हणून अश्या प्रकारची विधेयके आणली जात आहेत.

    त्यानंतर आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यामुळे आगामी महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बहुसदस्यिय प्रभाग रचना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.