दहिहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दहीहंडी हा लोकप्रिय सण असून या दिवशी सार्वजनिक सुट्टी मिळाल्यास सर्वांना उत्सवाचा आनंद लुटता येईल. मुंबई, ठाणे या शहरांबरोबरच महाराष्ट्रातील इतर लहान शहरांमध्येही या उत्सवाला स्पर्धेचे रुप प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राबरोबरच देश-विदेशातही हा सण लोकप्रिय झाला आहे. लहान-थोरांचा उत्साहाचा सण असलेल्या गोपाळकाला अर्थात दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

    मुंबई : लहान-थोरांचा उत्साहाचा सण असलेल्या गोपाळकाला (Gopalkala) अर्थात दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर करावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक (Mla Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच, दहीहंडीला राष्ट्रीय सण (Dahihandi National Festival) म्हणून मान्यता मिळावी अशी मागणीही त्यांनी केली.

    सरनाईक म्हणाले, दहीहंडी हा लोकप्रिय सण असून या दिवशी सार्वजनिक सुट्टी मिळाल्यास सर्वांना उत्सवाचा आनंद लुटता येईल. मुंबई, ठाणे या शहरांबरोबरच महाराष्ट्रातील इतर लहान शहरांमध्येही या उत्सवाला स्पर्धेचे रुप प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राबरोबरच देश-विदेशातही हा सण लोकप्रिय झाला आहे. भारतात स्पेनसारख्या देशांतून स्पर्धक भारतात येत आहेत. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे या सणावर विरजण पडले होते. पण आता परिस्थिती बदलल्याने तरुण वर्ग प्रचंड उत्साही आहे.