तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा : स्वप्निल सावंत

राज्यात गेली पाच महिने सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी. तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीचे निवेदन इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी तहसीलदार श्रीकांत पाटील यांना दिले आहे.

    इंदापूर : राज्यात गेली पाच महिने सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी. तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीचे निवेदन इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी तहसीलदार श्रीकांत पाटील यांना दिले आहे.

    मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण झाली आहे. जगात १२१ देशांपैकी १०७ व्या क्रमांकावर आपला देश आला आहे. हे अतिशय खेदजनक आहे. भारताची ही प्रतिमा सुधारण्यासाठी शेतकरी हिताचे व्यापक धोरण केंद्र सरकारकडून आखण्यात यावे. तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत करावी. शेतमजुरांसाठी विशेष अनुदान जाहीर करावे. या मागण्यांचा सरकारने सहानभूतीपूर्वक विचार करून दिवाळीपूर्वी भरीव मदत जाहीर करावी.अशा स्वरूपाच्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.

    यावेळी इंदापूर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, जिल्हा सरचिटणीस जाकीर काझी, शहराध्यक्ष चमनभाई बागवान, किसान सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. संतोष होगले, भगवान पासगे,तालुका सरचिटणीस श्रीनिवास शेळके, महादेव लोंढे, अनुसूचित जाती जमाती विभागाचे तालुकाध्यक्ष युवराज गायकवाड,नाशिर शेख,नागनाथ बंडलकर आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.`