बेस्ट बसच्या “होप ऑन होप ऑफ” बस पर्यटक सेवेचा आज लोकार्पण सोहळा

मुंबई शहरात रोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात.पर्यटकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने "होप आॅन होप आॅफ" 'हो हो'ही इलेक्ट्रिक वातानुकूलित बस सेवा सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत अर्ध्या तासाच्या अंतराने सुरु केली आहे.

    मुंबई (Mumbai) :  पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने ओपन डेक बस सेवा सुरु केली असून आता वातानुकूलित बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे यांच्या हस्ते “होप आॅन होप आॅफ” ‘हो हो’ या वातानुकूलित बस सेवेचे उदघाटन उध्या शुक्रवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वा. होणार आहे .

    हा समारंभ दोन वेळा अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याचे बेस्ट कडून कळवण्यात आले आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जुहू दरम्यान अर्ध्या तासाच्या अंतराने ही बस सेवा सुरु करण्यात येत असून यासाठी प्रती फेरी २५० रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. मुंबई शहरात रोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात.पर्यटकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने “होप आॅन होप आॅफ” ‘हो हो’ही इलेक्ट्रिक वातानुकूलित बस सेवा सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत अर्ध्या तासाच्या अंतराने सुरु केली आहे.

    सीएसएमटी येथून वीर जिजामाता भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय भायखळा, जुहू चौपाटी, वांद्रे बॅड स्टॅड, श्री सिद्धिविनायक मंदिर,नेहरु तारांगण, गिरगाव चौपाटी, तारापोरवाला मत्स्यालय मार्गे पुन्हा सीएसएमटी येथील शिवाजी महाराज वास्तूसंग्रहालय (म्युझियम) वानखेडे स्टेडियम, नरिमन पॉइंट, मंत्रालय या पर्यटनस्थळाचे इलेक्ट्रिक वातानुकूलित बसने दर्शन घेता येणार आहे.