स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका समर्पित

    नाशिक (Nashik) :  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने आज स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर स्मारकात जाऊन त्या ठिकाणी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका समर्पित केली. यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रमेश पवार, विशाल बलकवडे, प्रशांत कापसे, मनोज कुवर, मंगेश मरकड हे उपस्थित होते त्यानंतर ख्यातनाम साहित्यिक वि वा शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी जाऊन निमंत्रण पत्रिका समर्पित करण्यात आली.

    लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त व संमेलनाचे कार्याध्यक्ष, प्रसिद्ध लेखक हेमंत टकले यावेळी उपस्थित होते. लोककवी वामनदादा कर्डक यांचे निवासस्थानी त्यांच्या वंशजांना संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले. दलित साहित्याचे क्रांती विज्ञान मांडणारे तत्वज्ञ लेखक बाबुराव बागुल यांच्या निवासस्थानी जाऊन साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने संमेलनाची निमंत्रण पत्रिका समर्पित करून त्यांच्या वंशजांना निमंत्रण दिले. स्वागत मंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, निमंत्रक प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर हे उपस्थित होते.