
त्याने आपल्या दुकानाच्या बाहेर एक फलक लावला आहे.
सध्या बॉक्सऑफिसवर ‘द कश्मिर फाईल्स’ सिनेमाचा बोलबाला आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर भाष्य करतो. हा सिनेमा पाहून प्रेरित झालेल्या पुण्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने आपल्या हॉटेलमधील जेवण्याच्या थालीवर 20% ची सूट जाहीर केली आहे.
त्याने आपल्या दुकानाच्या बाहेर एक फलक लावला आहे. या फलकावर लिहलं की, देशप्रेमींसाठी डिस्काऊंट, दि कश्मिर फाईल्स सिनेमा पाहिल्याचे तिकीट जमा करा आणि जेवणाच्या बिलावर 20% सवलत घ्या. वंदे मातरम.
दरम्यान आता या सिनेमावर राजकारणही पेटताना दिसतं आहे. जम्मू कश्मिरमध्ये दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण करणाऱ्या ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात करमुक्त (टॅक्स फ्री) करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.तर भाजप नेते राम कदम यांनीही चित्रपट ट्रॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे
तर भाजप नेते राम कदम यांनीही चित्रपट ट्रॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे