nawab malik and anil deshmukh

अनिल देशमुख व नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik and Anil Deshmukh) यांनी विधानपरिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मतदान (Voting) करता यावे यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागणारी याचिका अर्ज दाखल केला आहे. अनिल देशमुख व नवाब मलिक (Anil Deshmukh and Nawab Malik) यांच्या अर्जांवर सुनावणी पूर्ण झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. निजामुद्दीन जमादार यांनी याबाबत निर्णय ठेवला राखून असून, उद्या दुपारी २.३० वाजता सुनावणी होणार आहे.

    मुंबई : राज्यात मागील आठवड्यात राज्यसभेच्या निवडणुका (Rajya sabha election) पार पडल्या. आता या निवडणुकानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकांची (Legislative Council election) जोरात चर्चा सुरु असून, पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विधानपरिषद निवडणुकासाठी मतांची जुळवाजुळवी तसेच रणनिती आखयला सुरुवात झाली आहे. राज्यसभेत दणक्यात विजय मिळवल्यानंतर आता भाजपचा (BJP) आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळं एक एक मतांसाठी रणनिती आखली जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते नवाब मलिक व अनिल देशमुख (NCP Leader Nawab Malik and Anil Deshmukh) हे सध्या तुंरुगात आहेत, त्यामुळं त्यांना राज्यसभा निवडणूक मतदान करण्यास कोर्टाने (Court) मज्जाव केला होता. त्यामुळं पुन्हा ती वेळ येऊ नये, यासाठी या दोघांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी पार पडली.

    दरम्यान, अनिल देशमुख व नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik and Anil Deshmukh) यांनी विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागणारी याचिका अर्ज दाखल केला आहे. अनिल देशमुख व नवाब मलिक यांच्या अर्जांवर सुनावणी पूर्ण झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. निजामुद्दीन जमादार यांनी याबाबत निर्णय ठेवला राखून असून, उद्या दुपारी २.३० वाजता सुनावणी होणार आहे. तसेच मतदान करण्यास मिळणार की नाही यावर सुद्धा उद्या निर्णय होणार आहे.

    मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, २० जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान होणार आहे. आणि यासाठी मतदान करण्याची परवानगी या दोघांनी मागितली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत देशमुख व नवाब मलिक यांना मतदानासाठी उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली होती. (After denying permission for Rajya Sabha, now in Deshmukh Court for Legislative Council elections)