विकासकामांमुळे जनतेने पुन्हा निवडून दिले; योगी आदित्यनाथ यांनी मानले जनतेचे आभार

आज सर्व देशाचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेचा निकाल जाहीर झाला असून योगी आदित्यनाथ यांना पुन्हा उत्तर प्रदेशच्या जनतेने कौल दिला असून प्रदेशमध्ये आता भाजपची एकहाती सत्ता आलेली आहे.

    लखनऊ : आज सर्व देशाचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेचा निकाल जाहीर झाला असून योगी आदित्यनाथ यांना पुन्हा उत्तर प्रदेशच्या जनतेने कौल दिला असून प्रदेशमध्ये आता भाजपची एकहाती सत्ता आलेली आहे.

    आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला असता त्यानी प्रंधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह उत्तर प्रेदेशमधील जनतेचे आभार मानले ते आपल्या भाषणात म्हणाले.

    योगी आदित्यनाथ नेमकं काय म्हणाले?

    राष्ट्रवाद, सुशासन आणि विकासाच्या मॉडलला जनतेने साथ दिली आहे. सबका साथ आणि सबका विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मार्गक्रमण करत आहोत. आमच्या डबल इंजिनच्या सरकारने उत्तर प्रदेशात सुरक्षा, संरक्षण निर्माण केलं. विकास केला. गरीब कल्याणकारी योजनांचा प्रभावीपणे अमंलबजावणी केली. त्यामुळेच उत्तर प्रदेशातील जनतेने जातीवाद, घराणेशाही वंशवादाच्या राजकारणाला तिलांजली देऊन आम्हाला भरभरून विजय मिळवून दिला आहे, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

    उत्तर प्रदेशात प्रचंड विजय मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी मतदारांचे आभार मानत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर घणाघाती हल्लाही चढवला. तसेच या विजयाने आमच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली असून ही जबाबदारी पार पाडण्यास आम्ही सज्ज आहोत, अशी ग्वाहीही योगी आदित्यनाथ यांनी दिली.

    उत्तर प्रदेशात भाजपला प्रचंड बहुमत मिळालं. त्यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला. मोदींच्या सुशासन आणि विकासाला जनता जनार्दनानी आशीर्वाद दिला आहे. चार राज्यात आपली सत्ता आणण्यात भाजप यशस्वी ठरलं आहे. उत्तर प्रदेश सर्वात मोठं राज्य आहे. या राज्यात तुम्ही प्रचंड बहुमत दिलं आहे. त्यासाठी मी उत्तर प्रदेशातील जनतेचे मनापासून आभार मानतो. भाजपच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या परिश्रमामुळे भाजपला मोठं बहुमत मिळालं. राज्यात सरकार बनवण्याची संधी मिळाली आहे. पहिल्यांदा उत्तर प्रदेशातील निकाल शांततेत पार पडले. उत्तर प्रदेशातील निकालाबाबतचा भ्रम पसरविला जात होता. मात्र, जनतेने तो फोल ठरवून आम्हाला विजयी केलं, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

    षडयंत्रकारींना धडा शिकवला

    पंतप्रधानांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला मार्ग मिळाला. आम्हाला तुम्ही प्रचंड बहुमत दिलं. आम्ही इतिहास बनवत आहोत. कोरोनाच्या संकटात रेशनपासून आम्ही सर्व काही उत्तर प्रदेशातील जनतेला दिलं. आम्ही करोना आणि भ्रष्टाचाऱ्याशी लढत होतो. तेव्हा हे लोक भाजप विरोधात षडयंत्र रचत होते. या षडयंत्रकारींना तुम्ही धडा शिकवला आहे. आता राष्ट्रवाद, सुरक्षा, विकास आणि सुशासनाच्या मुद्द्यावर आम्हाला प्रचंड बहुमत दिलं आहे. या कसोटीवर आम्ही सिद्ध होऊ, असंही त्यांनी सांगितलं.