धर्मरावबाबा आत्राम यांचा जीवनपट उलगडणार, ‘धर्मरावबाबा आत्राम – दिलों का राजा’ या डॉक्युड्रामाचा ट्रेलर रिलीज!

'धर्मरावबाबा आत्राम' चित्रपटात धर्मरावबाबा आत्राम यांनीच भूमिका केली असून राजू अवले, सुमेधा रामे, चिरंजीव गड्डमवार, एकनाथ अल्ताफ, दीपक, सत्यनारायण मेरगा, संजय मामूनकर, राजेश पुरी यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

  (Dharmaraobaba Atram Movie) गेल्या काही दिवसात अनेक राजकीय नेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट रुपेरी पडद्यावर आले. या चित्रपटांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. ही बाब लक्षात घेत आता महाराष्टातील आणखी एका नेत्याचा जिवनपट रुपेरी पडद्यावर येणार आहे. डॉक्युमेंटरी फॉरमॅट मध्ये लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, ज्याचं नाव आहे ‘धर्मरावबाबा आत्राम’. नुकताच या माहितीपटाचा ट्रेलर लॉन्चिंग करण्यात आला.

  प्रफुल पटेल यांच्या हस्ते ट्रेलर लॉन्च

  ‘धर्मरावबाबा आत्राम’ या डॉक्युड्रामाची निर्मिती नीतू जोशी यांनी केली असून भूषण चौधरी यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे . या माहितीपटाची कथा आणि संकल्पना या दोघांचीच आहे. महेश कांगणे यांनी गीतलेखनाबरोबरच संगीत नियोजनाची जबाबदारीही पार पाडली आहे. ‘धर्मरावबाबा आत्राम’ मध्ये धर्मरावबाबा आत्राम यांनीच भूमिका केली असून राजू अवले, सुमेधा रामे, चिरंजीव गड्डमवार, एकनाथ अल्ताफ, दीपक, सत्यनारायण मेरगा, संजय मामूनकर, राजेश पुरी यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. तर, जितेश मोरे यांनी तरुण बाबांचा पात्र साकारलयं. मंत्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते  ‘धर्मरावबाबा आत्राम’ हा माहितीपट ट्रेलर लॉन्च करण्यात आला.

  मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, “मला नवीन जीवन मिळालं. नक्षलवाद्यांच्या छापांपासून बाहेर पडलो, नदी नाल्यातून पाणी प्यायचो, जंगलाबाहेर निघणार नाही असे वाटत होते. ह्या सर्व प्रवासाचं आणि संघर्षाची घटना चित्रपटातून दाखवले असल्याचे त्यांनी सांगितले.

  दिग्दर्शक भुषण अरुण चौधरी म्हणाले, “आजही या वयात आत्राम प्रचंड उत्साही आहेत. चित्रपटात जितेश मोरे यांनी तरुण बाबांचा पात्र केलंय जितेश हा अतिशय अभ्यासु अभिनेता आहे त्यानी बाबांच आयुष्य खुप सुंदर रेखाटले असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

  अभिनेता जितेश मोरेने सांगितले की,”मला हे पात्र साकारायला मिळणं हे खरं तर माझ्यासाठी भाग्यचं म्हणाव लागेल. खूप संभाळून आणि अभ्यास करूनच व्यक्तिरेखा साकारली. मला शुटींग दरम्यान अनेक लोकांनी बाबा आत्राम यांच्या तरुणपणातील संदर्भ दिला. ही व्यक्तीरेखा साकारणे आव्हानात्मक होती असेही त्याने सांगितले.