धोम डावा कालव्याला खानापूर येथे भगदाड

धोमधरण व्यवस्थापणनाच्या भोंगळ कारभारामुळे आणि अकार्यक्षम उपअभियंत्याच्या बेजबाबदार कारभारामुळे वाई तालुक्यातील खानापूर गावातून १९७६ पासून जाणाऱ्या धोम धरणाच्या डाव्या कालव्याला तब्बल १० फूट रुंद आणि २० फुट लांबीचे ३० डिसेंबरच्या पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भलेमोठे भगदाड पडले.

    सातारा : धोमधरण व्यवस्थापणनाच्या भोंगळ कारभारामुळे आणि अकार्यक्षम उपअभियंत्याच्या बेजबाबदार कारभारामुळे वाई तालुक्यातील खानापूर गावातून १९७६ पासून जाणाऱ्या धोम धरणाच्या डाव्या कालव्याला तब्बल १० फूट रुंद आणि २० फुट लांबीचे ३० डिसेंबरच्या पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भलेमोठे भगदाड पडले. जायगुडे वाडीच्या पुलाला महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने पुलावरील वाहतुकीस धोकादायक बनले आहे. परिणामी, वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. खानापूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

    ज्या ठिकाणी आज कालव्याला भगदाड पडले आहे. त्याचठिकाणी गेल्या पाच महिन्यात तीनवेळा कालव्याच्या मध्यभागी भलेमोठे भगदाड पडले होते. त्याहीवेळी लाखो लिटर पाणी वाया जाऊन शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यावेळी धोम धरणाच्या उपअभियंत्यांनी तात्पुरती सिमेंट लावून मल्लमपट्टी करुन कालवा घाई घाईने सुरू केल्याने आज त्याचे रुपांतर कालव्याला भगदाड पडण्यात झाले.

    येथील बेजबाबदार असणाऱ्या उपअभियंत्यावर गुन्हे दाखल करुन करोडो रुपयांचे वाया गेलेल्या पाण्याचे पंचनामा करुन करोडो रुपयांची वसुली करावी, अशी मागणी वाई तालुक्यातील जनतेसह खानापुर ग्रामस्थांमधून होत आहे.