दिग्दर्शक अभिजीत पानसेंनी घेतली सचिन वाझेंची भेट,चर्चांना उधाण

मनसे नेते अभिजीत पानसे यांनी घेतलेल्या सचिन वाझेंच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

    मुंबई : रानबाजार वेबसिरिजमुळे सध्या चर्चेत असणारे दिग्दर्शक म्हणून अभिजित पानसे ( Abhijeet Panse) यांनी 100 कोटी वसूली प्रकरणातील आरोपी सचिन वाझे ( SachinVaze) यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. सचिन वाझे आणि अभिजीत पानसे यांच्या भेटीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अभिजित पानसे मनसेमध्ये (MNS) काही वर्षांपासून कार्यरत आहेत.

    अभिजीत पानसे यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात जाऊन सचिन वाझेची भेट घेतली आणि दोघांमध्ये बराचवेळ सविस्तर चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. नुकतच 100 कोटींच्या वसूली प्रकरणात सचिन वाझेने माफीचा साक्षीदार होण्याची विनंती मुंबई सत्र न्यायालयात केली होती. ही विनंती मान्य करत सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्याचं मान्य केलं. Director Abhijeet Panse meets Sachin Vaze