प्रियंका चोपडाच्या घटस्फोटाची चर्चा, इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जोनस हे अडनाव हटविले, पती निक याच्यासोबत नात्यांत कटूता आल्याच्या जोरदार अफवा

प्रियंका चोपडा आणि निक जोनस यांच्या लग्नाला येत्या १ डिसेंबरला ३ वर्षे पूर्ण होत आहेत, मात्र त्यापूर्वीच घडलेल्या एका घटनेने प्रियंकाचे फॅन्स आश्चर्यचकित झाले आहेत. नकतेच प्रियंकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जोनस हे अडनाव हटविले आहे. प्रियंकाच्या या मूव्हमुळे फॅन्समध्ये निक-प्रियंकाच्या नात्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

    मुंबई : प्रियंका चोपडा आणि निक जोनस यांच्या लग्नाला येत्या १ डिसेंबरला ३ वर्षे पूर्ण होत आहेत, मात्र त्यापूर्वीच घडलेल्या एका घटनेने प्रियंकाचे फॅन्स आश्चर्यचकित झाले आहेत. नकतेच प्रियंकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जोनस हे अडनाव हटविले आहे. प्रियंकाच्या या मूव्हमुळे फॅन्समध्ये निक-प्रियंकाच्या नात्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. प्रिय़ंकाने अडनाव हटविल्यानंतर या दोघांता बेबनाव निर्माण झाला असून, घटस्फोट होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या ऐकायला मिळते आहे.

    ही चर्चा सुरु झाल्यानंतरही, प्रियंकाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच या प्रकरणावर काही पोस्टही शेअर केलेली नाही. तिने आपल्या अडनावात बदल का केला, याची चर्चा मात्र तिच्या चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे. लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या आधी तिने उचलेलेलं हे पाऊल, मोठ्या निर्णयाचे संकेत असल्याचे मानण्यात येते आहे. याची घोषणा लवकरच होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते आहे.

    निकशी लग्नानंतर लावले होते जोनस अडनाव 

    प्रियंकाने लग्नानंतर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर निकचे जोनस हे अडनाव लावले होते. आता अडनाव हटविल्यावरही या दोघांच्या घटस्फोटाची अधितृत घोषणा अद्याप झालेली नाही. या दोघांनीही वेगवेगळअया मार्गावच चालायचे ठरवले आहे का, याचीही अद्याप स्पष्टता नाही. या प्रकरणात प्रियंकाच्या प्रतिक्रियेची वाट तिचे चाहते पाहत आहेत.

    सोमवारीच प्रियंकाने तिच्या नव्या हॉलिवूड प्रोजेक्ट्सची घोषणा केली आहे. त्यात मॅट्रिक्स सीरीजच्या नव्या सिनेमात प्रियंका दिसणार आहे, २२ डिसेंबरला हा नवा सिनेमा थिएटर्समध्ये दिसे. तसेच अजूनही काही बॉलिवूडच्या सिनेमात प्रियंका काम करते आहे.