Dispute between Manohar Parrikar's son Utpal Parrikar and state election in-charge Devendra Fadnavis

पणजी मतदारसंघात मागील 30 वर्षांपासून भाजपाची सत्ता होती. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र 2019 ला त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँगेसचे बाबुश मोंसरात यांचा विजय झाला. मात्र बाबुश पुढे भाजपावासी झाले. 2022 च्या निवडणुकीत आपल्याला भाजपाकडून हवी, अन्यथा आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे उत्पल यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. पर्रीकर यांनी पणजीत केलेली विकासकामे, पणजीतून त्यांना मानणारा त्यांचा मतदारवर्ग आणि पणजी आणि गोव्यासाठी त्यांचे असलेले योगदान याच्या जोरावर त्यांचे पुत्र उत्पल भाजपाकडून पणजीसाठी तिकीट मागत आहेत(Dispute between Manohar Parrikar's son Utpal Parrikar and state election in-charge Devendra Fadnavis).

  पणजी मतदारसंघात मागील 30 वर्षांपासून भाजपाची सत्ता होती. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र 2019 ला त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँगेसचे बाबुश मोंसरात यांचा विजय झाला. मात्र बाबुश पुढे भाजपावासी झाले. 2022 च्या निवडणुकीत आपल्याला भाजपाकडून हवी, अन्यथा आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे उत्पल यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. पर्रीकर यांनी पणजीत केलेली विकासकामे, पणजीतून त्यांना मानणारा त्यांचा मतदारवर्ग आणि पणजी आणि गोव्यासाठी त्यांचे असलेले योगदान याच्या जोरावर त्यांचे पुत्र उत्पल भाजपाकडून पणजीसाठी तिकीट मागत आहेत(Dispute between Manohar Parrikar’s son Utpal Parrikar and state election in-charge Devendra Fadnavis).

  पर्रीकरपुत्राचा बंडखोरीचा पवित्रा!

  पणजी, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पणजी येथील उमेदवारीवरून दिवंगत भाजपा नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समजूत काढल्यानंतरही पर्रीकर निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देता, मग मला का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.

  पणजीतून भाजपा आमदार बाबुश मोंसरात यांना तिकीट देणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे नाराज झालेले पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, त्यांनी निवडणूक लढवू नये यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पर्रीकर यांना दिल्लीत बोलावून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, उत्पल हे केवळ मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत म्हणून पक्ष त्यांना तिकीट देणार नाही, उत्पल यांची वेगळी ओळख आणि काम नसल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्याला उत्पल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

  नेत्याचा मुलगा म्हणून मला उमेदवारी मागायची असती तर ती मी माझया वडिलांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत मागितली असती. तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पणजीतून तिकीट देऊ शकतात तर माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट का नाही देऊ शकत. हा प्रकार केवळ पणजीतच सुरू आहे असे नव्हे तर संपूर्ण गोंव्यातील राजकीय स्थिती अस्वीकारार्ह असल्याचे उत्पल पर्रीकर म्हणाले.

  हे सुद्धा वाचा
  • 2022