Baramati youth killed over love affair in Bibwewadi; A case has been registered against the girl's husband and minor accomplices

शालिमार परिसरात हातगाडीचा दुचाकीस धक्का लागल्याच्या कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत दुचाकीस्वार दाम्पत्यासह त्यांच्या साथीदाराने दुकानावर दगडफेक करत बाप-लेकासह एकास मारहाण केली.

    नाशिक : शालिमार परिसरात हातगाडीचा दुचाकीस धक्का लागल्याच्या कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत दुचाकीस्वार दाम्पत्यासह त्यांच्या साथीदाराने दुकानावर दगडफेक करत बाप-लेकासह एकास मारहाण केली. तर व्यावसायिकानीच दाम्पत्यास मारहाण करत महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप पोलिसांत दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

    याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात परस्परांविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की बिरारी (रा. पेठरोड) या व्यावसायीकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री ते शालिमार येथे एका दुकानासमोरून हातगाडीवर दुकानाचे पार्सल घेवून जात असतांना इंदिरानगरातील दुचाकीस्वार दाम्पत्याने धक्का लागल्याच्या कारणातून वाद घातला. यावेळी संतप्त दाम्पत्याने अन्य दोन साथीदारांना बोलावून घेत दुकानावर दगडफेक केली. या टोळक्याने बिरारी यांच्यासह त्यांच्या वडिलांना आणि मामाला मारहाण केल्याचे म्हटले आहे.

    इंदिरानगरात राहणाऱ्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, व्यावसायिक विक्की बिरारी, संशयिताने विनयभंग केला. या घटनेत संशयितांनी दाम्पत्यास खुर्ची व लाकडी स्टुलने मारहाण केल्याने दोघे जखमी झाले असून, अधिक तपास हवालदार बोंबले व उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.