एसटी कर्मचाऱ्यांत चौकशीच्या पत्राने असंतोष; रुजू झाल्यानंतरही पत्र

  यवतमाळ (Yavatmal) : परिवहनमंत्री अनिल परब यांनी रुजू होण्यार्‍या निलंबित कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घेण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या आवाहनानंतर कर्मचारी रुजू होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, समक्ष चौकशीच्या पत्राने कर्मचाऱ्यांत पुन्हा असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे. निलंबन झालेल्या कर्मचाऱ्यांना 27, 30 व तीन डिसेंबरला समक्ष चौकशीला उपस्थित राहण्याचे पत्र महामंडळ प्रशासनाने दिले आहेत. त्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याने कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर उमटत आहे. दरम्यान, शनिवारी (ता. 27) समक्ष चौकशीच्या पहिल्या दिवशी अनेक कर्मचाऱ्यांनी याकडे पाठ फिरविली.

  ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली लालपरी गेल्या 20 दिवसांपासून जागेवरच उभी आहे. राज्य सरकार व एसटी कर्मचारी यांच्यात झालेल्या बैठकीत वेतनवाढ, कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याचे ठरले. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, एसटी कर्मचारी विलिनिकरणार अजूनही ठाम आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांच्या आवाहनानंतर अनेक विभागांत कर्मचारी रुजू होण्यास सुरुवात झाली आहे.

  परिवहन मंत्री परब यांची एसटी मुख्यालयातील बैठक निष्फळपरिवहन मंत्री परब यांची एसटी मुख्यालयातील बैठक निष्फळशिष्टमंडळात सहभागी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विलीनीकरणाच्या मागणी लावून धरत राज्य सरकारने महाधिवक्त्यांशी चर्चा करण्याची मागणी केली.

  एसटी महामंडळाचं कर्मचाऱ्यांना 24 तासांचं ‘अल्टिमेटम’
  एसटी महामंडळाचं कर्मचाऱ्यांना 24 तासांचं ‘अल्टिमेटम’संपकर्त्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन राज्य सरकारने करूनही, विलीनीकरणाच्या मागणीसाठी 250 आगारात संप कायम आहे. दैनंदिन तोटा वाढत आहे.

  त्यासंदर्भात आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची वरळीतील नेहरू सेंटर येथे बैठक सुरू आहे. मात्र, या बैठकीबाबत कमालीची गुप्ततात पाळली जात आहे. अद्यापही एसटी संपावर तोडगा निघाला नसल्याने ही बैठक सुरू आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी पुढाकार घेतला असून आता एसटी संपाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  यवतमाळ विभागातून एकही एसटी बाहेर आली नसली तरी आस्थापना व मॅकेनिक विभागातील कर्मचारी रुजू झाले आहेत. त्यात निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. रुजू झाल्यानंतरही निलंबित कर्मचाऱ्यांची समक्ष चौकशी लावली आहे. तीनदिवस कर्मचार्‍यांची चौकशी अधिकार्‍यांकडून चौकशी होणार आहे. त्यासाठी 27, 30 नोव्हेंबर व तीन डिसेंबर अशा तारखा निश्‍चित करण्यात आल्या आहेत.

  परिहवनमंत्र्यांच्या आश्‍वासनाने वातावरण शांत झाले होते. अनेक कर्मचारी रुजू होण्याच्या तयारीत होते. रुजू झाल्यानंतरही चौकशीचा फार्स लागल्याने कर्मचाऱ्यांत पुन्हा नाराजीचा सुर उमटत आहे. एसटी कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत. त्यानंतरही आम्ही रुजू होत आहे. असे असतानाही चौकशी केली जात असल्याने संपात सहभाग बरा, अशी चर्चा आता कर्मचाऱ्यांत सुरू आहे.