कोट्यवधींच्या रोड प्लॅनला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती, बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ

जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असलेले पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी वंचितच्या नेत्यांनी केली असून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 11 कोटींच्या 25 रस्ते आणि पुलांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. या कामांना आता अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग व जागतिक बँक प्रकल्प या यंत्रणामार्फत कामे करण्याचे नियोजन होते.

    अकोला (Akola) : ‘ग्रामीण भागातील रस्ते व पुलांच्या कामातील घोळाप्रकरणी काम सुरु करण्याच्या प्रक्रियेला अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे’, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे आता तरी पोलिसांनी याप्रकरणी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असलेले पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी वंचितच्या नेत्यांनी केली असून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 11 कोटींच्या 25 रस्ते आणि पुलांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. या कामांना आता अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग व जागतिक बँक प्रकल्प या यंत्रणामार्फत कामे करण्याचे नियोजन होते.

    अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांसाठी निधी मजूर करताना पालकमंत्र्यांनी पदाचा दुरूपयोग केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली होती. या तक्रारीनंतर जिल्हा नियोजन समितीच्या सचिव नीमा अरोरा यांनी सुनावणी घेतली आणि लेखाशिर्षक 3054 अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाला सात कामांकरिता 4 कोटी 40 लाख व जागतिक बँक प्रकल्पाला दोन कामांसाठी 50 लाख व लेखाशिर्षक 5054 अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाला 13 कामांकरिता 4 कोटी 29 लाख 40 हजार व जागतिक प्रकल्पाला तीन कामांकरिता 1 कोटी 80 हजारांची दिलेली प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत स्थगित केल्याचं पत्र काढले आहे.

    नदीतून रस्ता कसा करणार जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह सुनावणीचे इतिवृत्त देण्यात आले. मात्र यात चुकीची माहिती देण्यात आल्याचे वंचितचे डॉ. पुंडकर यांचे म्हणणे आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार धनेगाव जुने ते धनेगाव नवीन हा बाळापूर तालुक्यातील रस्ताच नाही. मुळ नाव धनेगाव जोड रस्ता असे आहे. धनेगाव जुने व धनेगाव नवीन या दोन्ही गावाच्या मध्ये निर्गुणा नदी वाहत असून नदीतून रस्ता कसा तयार करणार? असा प्रश्नही डॉ. पुंडकर यांनी केला असल्याने आता पालकमंत्री यांच्या अडचणी वाढल्या असून पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचितकडून करण्यात आली आहे.