जोकोविच ‘ग्रँडस्लॅम’खेळणार; ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉ मध्ये मिळाले स्थान

ऑस्ट्रेलियन खुली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत जगातील नंबर वन खेळाडू आणि नऊ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन नोवाक जोकविचच्या समावेशाबाबत असलेली अनिश्चितता अखेर दूर झाली आहे. वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनचा मुख्य ड्रॉ जाहीर झाला असून त्यात नोवाक जोकोविचलाही स्थान मिळाले आहे. यासोबतच प्रतिष्ठेच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्बियन जोकोविचचा सहभागही निश्चित झाला आहे. जोकोविच आपल्या पहिल्या सामन्यात मिओमिर केकमानोविचशी भिडणार आहे(Djokovic to play 'Grand Slam'; Place in the main draw of the Australian Open).

  मेलबर्न : ऑस्ट्रेलियन खुली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत जगातील नंबर वन खेळाडू आणि नऊ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन नोवाक जोकविचच्या समावेशाबाबत असलेली अनिश्चितता अखेर दूर झाली आहे. वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनचा मुख्य ड्रॉ जाहीर झाला असून त्यात नोवाक जोकोविचलाही स्थान मिळाले आहे. यासोबतच प्रतिष्ठेच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्बियन जोकोविचचा सहभागही निश्चित झाला आहे. जोकोविच आपल्या पहिल्या सामन्यात मिओमिर केकमानोविचशी भिडणार आहे(Djokovic to play ‘Grand Slam’; Place in the main draw of the Australian Open).

  व्हिसा लढा जिंकला

  नोवाक जोकोविचचा व्हिसा रद्द झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन-2022 मधील त्याच्या सहभागाबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र जोकोविचने तेथील कोर्टात ऑस्ट्रेलियन सरकारविरुद्ध लढा दिला आणि केस जिंकण्यात यश मिळवले. मेलबर्न कोर्टात सोमवारी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा ऑस्ट्रेलियन सरकारचा निर्णय चुकीचा ठरवला. यानंतर न्यायालयाने ऑस्ट्रेलियन सरकारला जोकोविचच्या पासपोर्टसह सर्व वस्तू तातडीने परत करण्याचे आदेश दिले. व्हिसा रद्द झाल्यानंतर जोकोविच चार दिवस इमिग्रेशन विभागाच्या हॉटेलमध्ये थांबला होता. जोकोविचवर कोरोनाची लस न घेतल्याचा आरोप होता, तर ऑस्ट्रेलियात याबाबत कडक कायदे आहेत.

  चुकीची दिली होती कबुली

  विशेष म्हणजे, गतवर्षी डिसेंबर महिन्यात कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतरही विलगीकरण करण्याऐवजी एका वृत्तपत्राला मुलाखत देण्यासाठी घराबाहेर पडणे महागात पडले, असा खुलासा जोकोविचने बुधवारी केला होता. कठीण कालखंडात तुम्ही सर्वानी पाठिंबा दिल्यामुळे मी आभारी आहे. परंतु डिसेंबरमधील माझ्या कृत्यांविषयी चुकीचे वृत्त सगळीकडे पसरत आहे. 14 डिसेंबरला एका बास्केटबॉल सामन्यासाठी मी हजेरी लावली. तेथून आल्यावर 16 तारखेला मी जलद प्रतिजन चाचणी केली. त्याचा निकाल नकारात्मक आला, असे जोकोविचने निवेदनात नमूद केले. त्याच दिवशी मी आरटी-पीसीआर चाचणीही केली. 17 तारखेला रात्री त्या चाचणीचा सकारात्मक निकाल आला. परंतु एका प्रतिष्ठित वृत्तपत्राला शब्द दिल्यामुळे त्या कामानिमित्त 18 डिसेंबरला घराबाहेर पडलो. तेव्हा वेळीच विलगीकरण केले असते, तर माझ्या ऑस्ट्रेलियातील प्रवेशावर इतका वाद उद्भवला नसता, असेही जोकोविचने सांगितले आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022