डॉक्टरने केला 500 खेळाडूंवर अत्याचार; खेळाच्या इतिहासातील सर्वांत मोठे लैंगिक शोषण

खेळाच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या लैंगिक शोषणाच्या घटनांपैकी एक असलेल्या अमेरिकेतील एका घटनेत अखेर मोठा निर्णय झाला आहे. अमेरिकेच्या खेळाडूंचा डॉक्टर असलेल्या या व्यक्तीने तब्बल 500 खेळाडूंचे लैंगिक शोषण केले होते. हा आरोपी डॉक्टर सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असून त्याच्याविरोधात खटला सुरू होता. अखेर या प्रकरणी आरोपीने लैंगिक शोषण केलेल्या पीडितांना भरपाई म्हणून 3000 कोटी रुपये देण्यावर सहमती झाली आहे. ही सर्व रक्कम पीडितांना दिली जाणार आहे(Doctor tortures 500 players; The biggest sexual abuse in the history of the game).

  न्यूयॉर्क : खेळाच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या लैंगिक शोषणाच्या घटनांपैकी एक असलेल्या अमेरिकेतील एका घटनेत अखेर मोठा निर्णय झाला आहे. अमेरिकेच्या खेळाडूंचा डॉक्टर असलेल्या या व्यक्तीने तब्बल 500 खेळाडूंचे लैंगिक शोषण केले होते. हा आरोपी डॉक्टर सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असून त्याच्याविरोधात खटला सुरू होता. अखेर या प्रकरणी आरोपीने लैंगिक शोषण केलेल्या पीडितांना भरपाई म्हणून 3000 कोटी रुपये देण्यावर सहमती झाली आहे. ही सर्व रक्कम पीडितांना दिली जाणार आहे(Doctor tortures 500 players; The biggest sexual abuse in the history of the game).

  पीडितांनी या प्रकरणी 425 मिलियन म्हणजेच जवळपास 3300 कोटी रुपयांची मागणी केली होती. मध्यस्थींनी चर्चेतून 380 मिलियन डॉलर ही नुकसान भरपाई अंतिम केली. यासह युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका (युएसए) जिमनॅस्टिक आणि लैंगिक शोषण पीडितांमध्ये सुरू असलेल्या कायदेशीर लढाईचा शेवट झाला आहे.

  क्रीडा क्षेत्रातील काळा अध्याय

  अमेरिकेतील खेळाडूंच्या लैंगिक शोषणाची ही घटना खेळाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. या प्रकरणात पीडितांना देण्यात आलेली आर्थिक भरपाई अशा प्रकरणातील आतापर्यंतची सर्वाधिक भरपाई आहे. ही रक्कम चार वेळा ऑलिम्पिक विजेती खेळाडू सिमोन बाईल्स, मेकायला मारोनी, एली रईसमनसारख्या सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंसह 500 खेळाडूंमध्ये वितरित केली जाणार आहे.

  या प्रकरणातील अधिवक्ता राशेल डेन होलंडर म्हणाले की, या प्रकरणात महिला खेळाडूंनी जो अत्याचार सहन केला, त्यांना जो त्रास झाला आणि जो त्रास होत आहे त्याची भरपाई कोणतीही आर्थिक रक्कम करू शकत नाही. मात्र, आता या प्रकरणाची चर्चा थांबायला हवी. कारण या महिलांना आता मदतीची गरज आहे. त्यांना आत्ताच ही मदत गरजेची आहे.

  आरोपी लेरी नासारच्या अत्याचाराचा बळी ठरलेल्या अनेक मुली आणि महिला सध्या नैराश्याच्या शिकार बनल्या आहेत. त्यांना आजही याचे मानसिक परिणाम भोगावे लागत आहेत. त्यांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. काहींनी तर लैंगिक अत्याचारानंतर आत्महत्येचाही प्रयत्न केला. या घटना आरोपी नासारने दाबल्या, असेही होलंडर यांनी नमूद केले.

  एफबीआयची बघ्याची भूमिका

  दरम्यान, या प्रकरणात पीडित महिला खेळाडूंनी ऑलम्पिक समिती आणि केंद्रीय तपास संस्था एफबीआयवरआरोपींवर कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. सिमोन बाईल्सला तर सिनेटसमोर साक्ष देताना अक्षरशः रडू कोसळले होते. तिनेच हे गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता ऑलम्पिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंची माफी मागत त्यांच्या हिमतीचे कौतुक केले आहे.