…म्हणून माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना डॉक्टरांचे निवेदन 

सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना व पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना यांच्या वतीने रविवारी (दि.२६) कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) या पदांमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना डावलण्यात आल्याने यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांची भरती व्हावी, यासाठी केंद्रीयस्तरावर पाठपुरावा चालू आहे.

    अकलूज : सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना व पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना यांच्या वतीने रविवारी (दि.२६) कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) या पदांमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना डावलण्यात आल्याने यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांची भरती व्हावी, यासाठी केंद्रीयस्तरावर पाठपुरावा चालू आहे.

    मात्र, यामध्ये म्हणावे तसे यश येत नसल्यामुळे आज होमिओपॅथीचे नेते डॉ. अरुण भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाळकृष्ण गायकवाड (सदस्य महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी मुंबई/जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना) यांच्या शिष्टमंडळाने माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांना होमिओपॅथिक डॉक्टरांच्या केंद्रीयस्तरावरील प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले व चर्चा करण्यात आली.

    यावेळी रणजितसिंहांनी ताबडतोब या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय व राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याशी दिल्ली येथे गेल्यावर चर्चा करून लवकरच केंद्रीयस्तरावर शासकीय बैठकीचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करतो व ही बैठक लावून आपला प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो, असे सांगितले.

    यावेळी खासदार नाईक-निंबाळकर यांचा सत्कार शाल, श्रीफळ, गुच्छ व श्रीमद्भगवद्गीतेचे पुस्तक देऊन सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना व पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना यांच्या वतीने करण्यात आला.

    यावेळी डॉ. बाळकृष्ण गायकवाड (सदस्य महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी मुंबई), डॉ. योगेश घोगरे पाटील (सदस्य सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना सोलापूर ), डॉ. सचिन बाबर (सदस्य, पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना), डॉ. विनायक गंभीरे (माढा तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन), डॉ. पांडुरंग गायकवाड (अध्यक्ष, माढा तालुका डॉक्टर्स असोसिएशन), डॉ. मीनाक्षी गायकवाड, डॉ. संदीप जगताप, डॉ. रियाज पठाण, डॉ. स्वप्नील शेलार, योगेश बोबडे (अध्यक्ष, भाजप माढा तालुका), नागेश कल्याणी अध्यक्ष रोटरी क्लब टेंभुर्णी), राजू शेठ येवले (अध्यक्ष, एमआयडीसी असोसिएशन टेम्भूर्णी), पांडुरंग कोल्हे, प्रवीण जगदाळे, सई गायकवाड उपस्थित होते.