डोंबिवलीत मनसे पदाधिकाऱ्यांने घडविले माणूकीचे दर्शन

डोंबिवली पूर्वेतील सुदामा नगर परिसरात सागर सोसायटी आहे. या सोसायटीत स्नेहा रामचंद्र दामले हे त्यांच्या पतीसोबत राहतात. पती पुरोहिताचे काम करतात.

    डोंबिवली : घरात एकटीच असताना ७४ वर्षाची आजी पलंगावरुन पडून जखमी झाली. मदतीसाठी तिने मनसे पदाधिकाऱ्याला संपर्क साधला. मनसे पदाधिकाऱ्याने रुग्णवाहिका शोधली. मात्र रुग्णवाहिकेस चालक उपलब्ध नसल्याने मनसे पदाधिकारी संजय चव्हाण यांनी स्वत: रुग्णवाहिकेचे चालक होऊन आजीबाईला रुग्णालयात दाखल केले. डोंबिवलीतील सुदामा नगरात ही घटना घडली. या घटनेमुळे मनसे पदाधिकाऱ्यांची माणूसकी समोर आली आहे.

    डोंबिवली पूर्वेतील सुदामा नगर परिसरात सागर सोसायटी आहे. या सोसायटीत स्नेहा रामचंद्र दामले हे त्यांच्या पतीसोबत राहतात. पती पुरोहिताचे काम करतात. दोघे एकटेच राहतात. पती काही कामानिमित्त बाहेर गेले असता सोमवारी रात्री स्नेहा दामले या पलंगावरुन खाली पडल्या. त्यांच्या पायाला गंभीर दुखापात झाली. कोणी मदतीसाठी नव्हते. त्यांनी संजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला.

    संजय चव्हाण हे डोंबिवली एमआयडीसी परिसरात राहतात. मनसेच्या विभाग अध्यक्ष पदावर कार्यरत आहे. त्यांनी तात्काल काही साथीदारांना घेऊन स्नेहा यांच्या घरी पोहचले. परिस्थिती पाहता रुग्णवाहिकेची शोधाशोध सुरु केली. त्यांना आजदेपाडा परिसरात रुग्णवाहिका उपलब्ध झाली. विनोद काळण यांची रुग्णवाहिका होती. त्यावर चालक उपलब्ध नसल्याने संजय चव्हाण यानी स्वत: रुग्णवाहिका चालवून स्नेहा यांच्या घराकडे आणली. स्नेहा यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. स्नेहा यांचा पाय फॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. संजय चव्हाण यांनी त्यांच्या कृतीतून माणूकीसेच दर्शन घडविले आहे.