पर्यावरणप्रेमी डॉ. दीपक शेटे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समिती यांच्याकडून डॉ. दीपक मधुकर शेटे यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

    शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समिती यांच्याकडून डॉ. दीपक मधुकर शेटे (Dr. Deepak Shete) यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी शिंदे व उपाध्यक्ष रंजन खरोटे यांनी दिले.

    डॉ. दीपक शेटे हे स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज मिणचे या निवासी शाळेत गेली 22 वर्षे गणित व विज्ञान हे विषय शिकवतात. डॉ. दीपक शेटे सातत्याने पर्यावरणपूर्वक सण साजरे करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी विशेष उपक्रम हाती घेतली आहेत. स्टार ऍकॅडमीच्यामार्फत शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल प्रबोधन समितीच्या वतीने गौरवपत्र देण्यात आले व त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल पर्यावरणप्रेमींकडून कौतुक होत आहे.