डॉ. प्रज्ञा सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड!

काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला होता, भाजपा उमेदवारांने दिवंगत पक्षांच्या उमेदवारानंतर त्याच पक्षांच्या उमेदवारासाठी माघार घेण्याची राज्यातील प्रथा परंपरा पाळावी अशी विनंती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केली होती.

    मुंबई (Mumbai) :  काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला होता, भाजपा उमेदवारांने दिवंगत पक्षांच्या उमेदवारानंतर त्याच पक्षांच्या उमेदवारासाठी माघार घेण्याची राज्यातील प्रथा परंपरा पाळावी अशी विनंती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केली होती. त्यामुळे भाजपने अर्ज मागे घेतल्याने सातव यांची बिनविरोध झाली.

    विरोधी पक्ष भाजपाचे आभार
    यावेळी देखील कॉंग्रेसचे दिवंगत सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर ही पोटनिवडणूक झाली. त्यामुळे ती प्रथा आणि परंपरा पाळत बिनविरोध करावी असा कॉंग्रेसचा आग्रह होता. त्यानुसार भाजपने जागा सोडल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष तसेच विरोधी पक्ष भाजपाचे आभार मानले.

    निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना प्रज्ञा सातव यांना प्रमाणपत्र देताना विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. या मान्यवरांनी विजयी उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.  यापूर्वी राज्यसभेच्या राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवरही भाजपने कॉंग्रेसच्या रजनी सातव यांच्यासाठी संजीव उपाध्याय यांचे नामांकन माघारी घेतले होते.