प्रशिक्षक राहुल द्रविडने दिला गुरूमंत्र, त्यानंतर विराटने झळकावले शानदार अर्धशतक

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना शुक्रवारी कोलकाता येथे खेळला गेला. यामध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची झलक पाहायला मिळाली. कोहलीने शानदार फलंदाजी करताना ४१ चेंडूत ५२ धावा केल्या. या खेळीत त्याच्या बॅटने ७ चौकार आणि १ षटकार मारला.

  कोलकाता: ड्रिंक्स ब्रेक दरम्यान मैदानात आले प्रशिक्षक राहुल द्रविड, त्यानंतर विराटने झळकावले शानदार अर्धशतक
  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-२० सामना शुक्रवारी कोलकाता येथे खेळला गेला. विराटच्या या खेळीत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा मोठा हात होता. वास्तविक, भारतीय डावात १०व्या षटकात ड्रिंक्स ब्रेक घेण्यात आला होता. ब्रेक दरम्यान भारतीय प्रशिक्षक द्रविड विराट कोहलीशी सतत बोलताना दिसले. ड्रिंक्स ब्रेकपर्यंत विराट ३६ धावांवर फलंदाजी करत होता आणि ब्रेकनंतर त्याने १४ चेंडूत १६ धावा केल्या.

  षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले
  विराट कोहली आपल्या खेळीदरम्यान अप्रतिम लयीत दिसला आणि त्याने ३९ चेंडूत षटकार ठोकून आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे टी२०I मधले ३० वे अर्धशतक आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे सहावे अर्धशतक होते. ५२ धावा करून कोहली बाद झाला आणि रोस्टन चेसने त्याच्या डावाला ब्रेक लावला.

  कोहलीने भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी ३६ चेंडूत ४९ आणि ऋषभ पंतसोबत चौथ्या विकेटसाठी २३ चेंडूत ३४ धावांची भागीदारी केली.

  टीम इंडियाने ताकद दाखवली
  दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा ८ धावांनी पराभव केला. विंडीजसमोर १८७ धावांचे लक्ष्य होते. परंतु, संघाला २० षटकात ३ गडी गमावून केवळ १७८ धावा करता आल्या आणि सामना गमावला. या विजयासह टीम इंडियाने टी-२० मालिकाही जिंकली आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची सलग चौथी टी-२० मालिका जिंकली.
  टीम इंडियाने नाणेफेक गमावून प्रथम खेळताना १८६/६ धावा केल्या. ऋषभ पंतने नाबाद ५२ धावा केल्या, तर विराट कोहलीनेही ५२ धावा केल्या. विंडीजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक ३ बळी घेतले.