जम्मू -काश्मिरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

जम्मू-काश्मिरला आज भूकंपाचे धक्के बसले (Earthquake In Jammu Kashmir) आहेत. भुकंपाचे केंद्रस्थान हे अफगाणिस्तान - ताजिकिस्तान हे दाखवण्यात आले आहे.

    नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरमध्ये आज भूकंप (Earthquake In Jammu Kashmir) झाला आहे. या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल अशी आहे. भूकंपाचे केंद्रस्थान हे अफगाणिस्तान – ताजिकिस्तान हे दाखवण्यात आले आहे. हा भूकंप आज दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी झाला आहे. (EarthQuake) मिळालेल्या माहितीनुसार, भुकंपामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही.

    या घटनेची माहिती भूकंप विज्ञान केंद्राद्वारे ट्विट (National Center for Seismology) करुन देण्यात आली आहे. या भूकंपाचे केंद्रस्थान अफगानिस्तान आणि ताजिकिस्तान असले तरी त्याचे धक्के हे जम्मू काश्मिरपर्यंत बसले आहेत, असे भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीवरून स्पष्ट होते.