Eat gutkha, Get Rewards

दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा हे व्यसन आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. हे व्यसन सोडण्यासाठी वारंवार जनजागृती केली जाते. तरीसुद्धा अनेक जण याचे सेवन करतात. अशात आता गुटख्याबाबत आयएएस अधिकाऱ्याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. गुटखा खाणाऱ्याला 7 पुरस्कार मिळणार, अशा आशयाची ही पोस्ट आहे(Eat gutkha, Get Rewards).

    मुंबई : दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा हे व्यसन आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. हे व्यसन सोडण्यासाठी वारंवार जनजागृती केली जाते. तरीसुद्धा अनेक जण याचे सेवन करतात. अशात आता गुटख्याबाबत आयएएस अधिकाऱ्याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. गुटखा खाणाऱ्याला 7 पुरस्कार मिळणार, अशा आशयाची ही पोस्ट आहे(Eat gutkha, Get Rewards).

    आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात एका भिंतीवर गुटख्याबाबत मजकूर लिहिण्यात आला आहे. यात गुटखा खाणाऱ्याला पुरस्कार मिळणार असे नमूद करण्यात आले आहे.

    7 पुरस्कारांबाबत माहितीही देण्यात आली आहे. या 7 पुरस्कारांमध्ये प्रथम पुरस्कार म्हणून कॅन्सरचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर पुढे एकेएक पुरस्कार सांगण्यात आला आहे. त्यानंतर सातवा आणि शेवटचा पुरस्कार म्हणजे त्या व्यक्तीचे राम नाम सत्य होते पक्के.