बागेश्वर धाम सरकार म्हणजे धीरेंद्र शास्त्री कोण आहेत? किती झालयं शिक्षण?, कुटुंबात कोण कोण आहेत?

धीरेंद्र शास्त्री वयाच्या नवव्या वर्षापासून आजोबांसोबत मंदिरात जायला लागले. त्यांच्याकडूनच मी रामकथा शिकलो. म्हणूनच तो आजोबांना आपला गुरू मानतो. असं ते म्हणाले.

  बागेश्वर धाम (Bageshwar Dham) नावाने प्रसिद्ध असेलेले बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री उर्फ ​​बाबा बागेश्वर आजकाल आपल्या चमत्कारिक शक्तीमुळे चर्चेत आले आहे. त्यांच्या चमत्कार करण्याच्या शक्तीमुळे सगळ्यांना हे जाणून घेण्यास उत्त्सुकता आहे की हे बागेश्वर  बाबा नेमकं करतात तरी कस? वयाच्या अवघ्या २६ वर्षी धीरेंद्र शास्त्री  हे बाबा बागेश्वर कसे बनले जाणून घ्या.

  कुटुंबात कोण कोण?

  लोकांच्या मनातल्या समस्या हेरुन त्या अचून सांगणारे बाबा बागेश्वर हे सध्या खूप चर्चेत आहेत. बाबा बागेश्वर म्हणजे धीरेंद्र शास्त्री यांच वय अवघे २६ वर्षे आहे. त्यांचा जन्म 4 जुलै 1996 रोजी मध्य प्रदेशातील छतरपूर गार्हा गावात झाला. त्यांचे वडील रामकृपाल गर्ग गावातच सत्यनारायणाची कथावाचन करत होते. तर कधी कधी धीरेंद्र शास्त्रीही वडिलांसोबत कथा सांगण्ययास जात होते. घरी दुध विक्रीचा व्यवसाय होत.

  शालेय जीवन

  रिपोर्ट्सनुसार, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी गंज गावातून हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी बीएची पदवी घेतली. त्यांचे बालपण गरिबीत गेले असे म्हणतात. ते स्वतः वडिलांसोबत कथा वाचायचे. आई-वडीव दुध विक्रीच व्यवसा करत होते.

  आजोबांना मानतात गुरु

  रिपोर्ट्सनुसार, धीरेंद्र शास्त्री यांचे आजोबा सिद्ध पुरुष होते. या मंदिरात दर मंगळवार व शनिवारी ते दरबार भरत असत. तेव्हापासून लोक या मंदिरात अर्ज करतात. धीरेंद्र शास्त्रीही वयाच्या नवव्या वर्षापासून आजोबांसोबत मंदिरात जायला लागले. त्यांच्याकडूनच मी रामकथा शिकलो. म्हणूनच तो आजोबांना आपला गुरू मानतो.

  वास्तविक, बागेश्वर सरकारचा दावा आहे की त्यांना जनतेचे मन माहित आहे. एवढेच नाही तर ते कोणाला न सांगता त्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय लिहून ठेवतात. यानंतर ते अचानक त्याच्या नावाने हाक मारतात, मग समोर येणारी व्यक्ती. तो तीच समस्या सांगतो, जी बाबांनी आधीच एका कागदावर लिहून ठेवली आहे.