रेव्ह पार्टी प्रकरणी एल्विश यादव नोएडा पोलिसांसमोर हजर, तीन तास झाली चौकशी!

मंगळवारी नोएडा पोलिसांनी रेव्हा पार्टीत सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणात सहभागी असलेल्या एल्विश यादवला नोटीस पाठवली आणि त्याला चौकशीसाठी बोलावले.

  बिग बॅास ओटीटी 2 विजेता (Bigg Boss OTT Winner) एल्विश यादव (Elvish yadav) सध्या चांगलाच चर्चेत आहे. दिल्ली एनसीआर परिसरातील अनेक ठिकाणी रेव्ह पार्टीचं आयोजन, पार्टीत विषारी सापाचं विषं, परदेशी मुली पुरवल्याचा आरोप करत एल्विश यादवसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आता अपडेट समोर आली असून एल्विश यादव नोएडा पोलिसांसमोर हजर झाला. नोएडाच्या सेक्टर 20 पोलिस स्टेशनने एल्विश यादवची तीन तास चौकशी करण्यात आली.

  मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारीच नोएडा पोलिसांनी एल्विश यादवला चौकशीसाठी नोटीस बजावली होती. एल्विश यादव रात्री उशिरा मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास एल्विस यादव कोतवाली सेक्टर 20 येथे पोहोचला होता आणि तेथे पोलिसांच्या पथकाने त्यांची चौकशी केली. यावेळी सापाच्या विषाच्या पुरवठ्याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. आता एल्विश यादवची पुन्हा चौकशी होणार असून त्याला पुन्हा बोलावण्यात आले आहे. अटक आरोपी राहुलचा रिमांड मिळाल्यानंतर पोलीस एल्विशला त्याच्यासमोर बसवून त्याची चौकशी करू शकतात.

  मंगळवारी नोएडा पोलिसांनी रेव्हा पार्टीत सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणात सहभागी असलेल्या एल्विश यादवला नोटीस पाठवली आणि त्याला चौकशीसाठी बोलावले. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्या पोलीस कोठडीची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांचे अधिक तपास करत आहे.

  अटक करण्यात आलेल्या सर्पमित्रांकडे परवाना नव्हता

  या पाच सर्पप्रेमींना नोएडा पोलिसांनी नऊ सापांसह अटक केली. त्यांच्याकडे साप पाहण्याचा परवानाही नाही. काही सापांसाठी परवानेही वनविभागाकडून दिले जातात. कायदेशीर अभिप्राय घेऊन पोलीस आता याप्रकरणी पुढील कारवाई करत असून त्यानंतर स्वतंत्र कलमे जोडता येतील.

  वनविभाग व्हिडिओची करणार चौकशी

  एल्विशच्या गळ्यात साप असलेल्या व्हिडिओचीही वनविभाग चौकशी करत आहे. या प्रकरणी जिल्हा वन अधिकारी पीके श्रीवास्तव यांनी सांगितले की, तपास पूर्ण झाल्यानंतर विभागात एल्विशविरुद्ध एचटीयू गुन्हाही दाखल केला जाईल. दोषी आढळल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.