रेव्ह पार्टी प्रकरण तापलं! एल्विश यादव मेनका गांधींविरोधात मानहानीच खटला दाखल करणार

झालेल्या प्रकरामुळे आपली प्रतिमा मलिन झाली असून आपण मेनका गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं एल्विश यादव म्हणालाय

    बिग बॅास ओटीटी 2 विजेता (Bigg Boss OTT Winner) एल्विश यादव (Elvish yadav) सध्या चांगलाच चर्चेत आहे. दिल्ली एनसीआर परिसरातील अनेक ठिकाणी रेव्ह पार्टीचं आयोजन, पार्टीत विषारी सापाचं विषं, परदेशी मुली पुरवल्याचा आरोप करत एल्विश यादवसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एल्विश यादवने  त्याच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याची असल्याचं सांगितलं आहे. आता त्याने पुन्हा एक व्हिडिओ शेअरकरुन माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मेनका गांधी (Maneka Gandhi) यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे.

    काय म्हणाला एल्विश यादव

    शनिवारी एल्विश यादवने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन व्लॉग शेअर केला. या व्लॉगमध्ये त्यांनी दावा केला आहे की, मेनका गांधी यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा खराब झाली असून याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. व्हिडिओमध्ये एल्विश म्हणाला, ‘माझ्यावर आरोप करण्यात आले, मेनका गांधीजींनी मला सप्लायरचा प्रमुख बनवले. मानहानीची केस तर होणार भाऊ, मी असे सोडणार नाही. पूर्वी मला वाटायचं की, मी यासगळ्यात माझा वेळ वाया घालवत आहे. पण माझी प्रतिमा मलिन झाल्यावर मी सोडणार नाही.’

    नेमकं प्रकरण काय

    मिळालेल्या माहितीनुसार, पीएफए ​​या संस्थेने तक्रार दाखल केली होती की, एल्विश यादव नावाचा यूट्यूबर त्याच्या टोळीसह सापाचे विष आणि जिवंत साप पुरवतो. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून काही जणांना अटक केली.  घटनास्थळावरून पाच जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये बदरपूर येथील राहुल, टिटूनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ यांचा समावेश आहे. झडती घेतली असता राहुलच्या कमरेला लटकलेल्या पिशवीत सापाच्या विषाने भरलेली प्लास्टिकची बाटली सापडली. प्रत्येकाच्या जवळ नऊ जिवंत साप आढळले. ज्यामध्ये पाच कोब्रा, एक अजगर, एक घोड्याच्या शेपटीचा साप आणि दोन दोन डोकी असलेल्या सापांचा समावेश आहे.