गुवाहाटी –  दि्ल्ली विमानाच इमरजन्सी लॅडिंग

Indigo Flight Emergency Landing, Emergency Landing, guvahati-delhi flight

    गुवाहाटी वरुन दि्ल्लीच्या दिशने झेपावलेल्या इंडिगो विमानाला एका पक्ष्याची धडक बसल्याने त्याच इमरजन्सी लॅडिंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळेतच हा प्रकार घडल्याने विमानाच इमरजन्सी लॅडिंग करून यामधील प्रवाशांना दुसऱ्या विमानात बसवण्यात आलं.

    दिल्लीला निघालेल्या इंडिगो एयरबस A320neo (VT-ITB) फ्लाइट 6E 6394 ने उड्डाण घेतल्यानंतर या विमानाचं इमरजन्सी लॅडिंग करण्यात आलं एकाच दिवसात विमानाचं इमरजन्सी लॅडिंग करण्यात आल्याची ही तिसरी घटना ठरली. गुवाहाटी आधी जबलपूर आणि पाटणामध्येही विमानाचं इमरजन्सी लॅडिंग करण्यात आल्याच्या घटना घडल्या.