कर्मचाऱ्यांनीच मारला बँकेतील दोन कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

याच बँकेच्या मागे रहाणारा शिपाई राहुल पाटीलची पोलीसांनी चौकशी केली असता तो चौकशीला सहकार्य करत नव्हता. मात्र, जेव्हा पोलीसांनी खाक्या दाखविल्या असता तो पोपटासारखा बोलुला लागला. या चोरी प्रकरणी बँक शिपाई राहुल पाटील व त्याच्या अन्य दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात आरोपींच्या संखेत वाढ होण्याची शक्यता पोलीसांकडुन वर्तविली जात आहे. यावेळी जळगाव येथिल श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

  जळगाव – भडगाव तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी आणि नागरिकांनी तारण ठेवलेल्या सुमारे दोन कोटी रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी झाली. मात्र, ही चोरी बँकेतील कर्मचाऱ्यांनी केल्याचे आता उघड झाले आहे.

  घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी भेट देत पोलीस अधिकाऱ्यांना पुढील तपासा बाबत सुचना केल्या आहेत. भडगाव तालुक्यातील आमडदे येथे महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेची शाखा असुन येथे मॅनेजर सह तीन कर्मचारी कार्यरत आहेत.

  २२ नोव्हेंबर रोजी रात्री १ ते २.३० वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी झाल्याची माहिती गावात पसरली. हि माहिती कर्मचाऱ्यांनीच गावातील नागरीकांना दिली. घटनेची माहिती भडगाव पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना बँकेत चोरी करताना चोरांकडुन बँकेचे कुलुप तोडणे, तिजोरी फोडणे, लॉकर तोडल्याचा असा कोणताच प्रकार दिसुन येत नव्हता.

  याच बँकेच्या मागे रहाणारा शिपाई राहुल पाटीलची पोलीसांनी चौकशी केली असता तो चौकशीला सहकार्य करत नव्हता. मात्र, जेव्हा पोलीसांनी खाक्या दाखविल्या असता तो पोपटासारखा बोलुला लागला. या चोरी प्रकरणी बँक शिपाई राहुल पाटील व त्याच्या अन्य दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात आरोपींच्या संखेत वाढ होण्याची शक्यता पोलीसांकडुन वर्तविली जात आहे. यावेळी जळगाव येथिल श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

  भडगाव पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींची सखोल चौकशी करुन त्यांची चौरलेले सर्व दागीने ताब्यात घेतले आहेत. आरोपींनी हा चोरीचा माल एका सहकाऱ्याच्या आमडदे शेत शिवारातील जोगडा कडील शेतात व आंचळगाव रस्त्याकडील शेतात खड्डा करुन लपवला होता.

  दरम्यान, या प्रकरणात नेमकी किती रूपयांचे दागिने चोरण्यात आले होते याची माहिती मिळाली नाही. मात्र हा आकडा अंदाजे दोन ते तीन कोटी रूपयांचा असल्याची चर्चा आहे.