महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतरांच्या शासनाकडील प्रलंबित मागण्यासाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या संपामध्ये बार्शीमधील झाडबुके महाविद्यालय, श्री शिवाजी महाविद्यालय, बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, एज्युकेशन कॉलेज, लॉ कॉलेज येथील शिक्षकेतर कर्मचारी १८ डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत. 

    बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतरांच्या शासनाकडील प्रलंबित मागण्यासाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या संपामध्ये बार्शीमधील झाडबुके महाविद्यालय, श्री शिवाजी महाविद्यालय, बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, एज्युकेशन कॉलेज, लॉ कॉलेज येथील शिक्षकेतर कर्मचारी १८ डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

    मंगळवारी संपाचा चौथा दिवस होता. यामध्ये महाविद्यालय शिक्षकेतर महासंघ, आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना, सोलापूर विद्यापीठ शिक्षकेतर संघटना सहभागी झाल्या आहेत.

    आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले जीआर पुर्नजिवीत करावेत, दहा वीस तीस वर्ष लाभांची आश्वासित प्रगती योजना, 796 विद्यापीठ कर्मचारी पदांना सातवा वेतन आयोग, 58 महिन्याचा फरक, पाच दिवसांचा आठवडा व इतर मागण्या संपामध्ये करण्यात आल्या आहेत.

    हा संप यशस्वी करण्यासाठी आयटकचे सचिव कॉ.डॉ.प्रवीण मस्तुद, उमेश मदने, सुधीर सेवकर, अशोक पवार महासंघाचे भीमा मस्के आयटकचे गणेश करंजकर, जयंत पवार, आनंद देशमुख, शिवाजी हाके, कासार, मोळवणे एस एस, शिंदे, चंद्रकांत गव्हाणे, संदीपान पिंगोरे, भाऊ लांडगे, एसडी महाडिक, सूर्यकांत घोलप, दीपक शिर्के, विक्रांत काकडे, स्वामी, वाघमारे एस एस, शेळके संभाजी, राजाभाऊ वेदपाठक आदी सहभागी झाले होते.