इंग्लंडमध्ये हिंदू-मुस्लिमांत हाणामारी; पोलिसांवर काचेच्या बाटल्या फेकल्या, २ जण ताब्यात

आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानच्या पराभवानंतर मुस्लिम आणि हिंदू समुदायांमध्ये तणावाची सुरुवात झाली होती. २८ऑगस्ट रोजी भारतीय क्रिकेट संघाने आशिया कपमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. यानंतर ६ सप्टेंबर रोजी संतप्त पाकिस्तानी मुस्लिमांनी लिसेस्टरमध्ये हिंदूंवर हल्ला केला.

    नवी दिल्ली – ब्रिटनमधील लिसेस्टरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी मुस्लिम आणि हिंदूंमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी अचानक दोन समुदायांचे जमाव येथे जमले आणि त्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर काचेच्या बाटल्याही फेकण्यात आल्या. लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या जमावाने मालमत्तेचेही नुकसान केले.

    आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानच्या पराभवानंतर मुस्लिम आणि हिंदू समुदायांमध्ये तणावाची सुरुवात झाली होती. २८ऑगस्ट रोजी भारतीय क्रिकेट संघाने आशिया कपमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. यानंतर ६ सप्टेंबर रोजी संतप्त पाकिस्तानी मुस्लिमांनी लिसेस्टरमध्ये हिंदूंवर हल्ला केला.

    रविवारच्या चकमकीनंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. लिसेस्टर शहर लंडनपासून फक्त १६० किमी अंतरावर आहे. लिसेस्टर पोलिस चीफ कॉन्स्टेबल रॉब निक्सन म्हणाले – आम्हाला पूर्व लिसेस्टरमध्ये तणावाची माहिती मिळाली आहे.

    परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोकांना थांबवून तपास करण्याचे अधिकार या पोलिसांना देण्यात आले आहेत. निक्सन यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही दिवस या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.