पत्नीला करंट देऊनही गेला नाही जीव मग पतीने केलं असं भयंकर कृत्य की… वाचा सविस्तर

चंद्रपूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पती, पत्नीत झालेल्या वादाचे रूपांतर क्रूर घटनेत झाले. रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला विद्युत करंट देऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्युत करंटने पत्नीचा मृत्यू झाला नाही हे लक्षात येताच पतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून पत्नीला ठार केले.

    चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पती, पत्नीत झालेल्या वादाचे रूपांतर क्रूर घटनेत झाले. रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला विद्युत करंट देऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्युत करंटने पत्नीचा मृत्यू झाला नाही हे लक्षात येताच पतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून पत्नीला ठार केले.

    दरम्यान सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यानंतर पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यात आज उघळकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना जिल्ह्यातील भंगाराम तळोधी येथे घडली. योगीता राजू बावणे असे मृत महीलेचे नाव आहे.

    आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पती राजू बावणे याचावर पोलीस निगरानीत उपचार सूरू आहे. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याचावर गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सूरू आहेत. तर हत्येचं नेमकं कारण काय ? याचा उलगडा अद्याप झालेला नसून पोलीस संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

    दरम्यान, पुढील तपास ठाणेदार राजगुरू यांच्या मार्गर्शनात सुरू आहे. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याचावर गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सूरू आहेत. तर हत्येचं नेमकं कारण काय ? याचा उलगडा अद्याप झालेला नसून पोलीस संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.