nirmala sitharaman

मोदी सरकारनं वरिष्ठ नागरिकांसाठी दिलेल्या वचनांपैकी मोठ्या वचनाची पूर्तता करण्यात आल्याचं सांगण्यात येतय.

    नवी दिल्ली : बजेट २०२३ (Budget 2023) चे वेध देशाला लागले आहेत. या बजेटमध्ये नवीन काय असेल, सर्वसामान्यांना बजेटमध्ये काय मिळणार, याची चर्चा आतापासून सुरुयेत. अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशातील वरिष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिलाय. मोदी सरकारनं वरिष्ठ नागरिकांसाठी दिलेल्या वचनांपैकी मोठ्या वचनाची पूर्तता करण्यात आल्याचं सांगण्यात येतय.

    जेष्ठ नागरिकांना ‘ही’ सवलत

    ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या वरिष्ठ नागरिक, ज्यांना उत्पन्न म्हणून पेन्शन आणि बँकेत जमा होणारे व्याज मिळत असेल, तर ते यापुढं करमुक्त असणार आहे. आता यापुढे अशा जेष्ठ नागरिकांना इन्कम टॅक्स भरावा लागणार नसल्याची घोषणा करण्यात आलीय. अर्थ मंत्रालयाच्या ट्विटरवर ही माहिती देण्यात आलीय.

    वरिष्ठ नागरिकांना मोठा दिलासा

    ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना या निर्णयामुळं मोठा दिलासा मिळणार आहे. वरिष्ठांना आयकरातून मुक्तता मिळाल्यानं त्यांना आयटी रिटर्न्स भरण्याचीही गरज उरणार नाहीये. मात्र या आयकरातून सुटीचा लाभ केवळ ज्यांना पेन्शन येतं किंवा बँकेतल्या ठेवींच्या व्याजातून ज्यांचा उदरनिर्वाह सुरु आहे, त्यांनाच घेता येणार आहे. या निर्णयासाठी इन्कम टॅक्स १९६१ च्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. त्यात नवीन सेक्शन 194-P जोडण्यात आले असून, या बदलाची माहिती बँकांनाही देण्यात आलीय.

    आयटी रिटर्न भरण्याची गरज नाही

    आयकरात सूट दिल्या जाणाऱ्या या वरिष्ठ नागरिकांना आता इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागणार नाही. ज्या बँकेत त्यांचं खात आहे, त्याच खात्यातून बँका आवश्यक तो कर कापून घेणार आहेत. रिटर्न भरण्यासाठी सवलत मिळवण्यासाठी वरिष्ठ नागरिकांना 12 BBA फॉर्म भरुन बँकेत जमा करावा लागणार आहे.