
दिव्यांग कल्याण महामंडळआची जबाबदारी कडू यांना देण्यात आली आहे. तसंच दिव्यांग खात्याचं अभियान प्रत्येक दिव्यांगांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
अमरावती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात सामील झालेले आणि राज्यातील अपक्ष आमदारांचं नेतृत्व करणारे बच्चू कडू (Bachu Kadu) यांना मंत्रिपदाचा (Minister) दर्जा मिळालेला आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून आमदार बच्चू कडू यांची निवड करण्यात आलेली आहे. जनशक्ती प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा गेल्या वीस वर्षांपासून दिव्यांगांसाठी लढा सुरु होता. अखेर आमदार बच्चू कडू यांना सरकार दरबारी यश मिळालेलं आहे. याबाबतचं स्वतंत्र मंत्रालय आणि आता महामंडळ शिंदे सरकारच्या काळात निर्माण करण्यात आलं आहे. दिव्यांग कल्याण महामंडळआची जबाबदारी कडू यांना देण्यात आली आहे. तसंच दिव्यांग खात्याचं अभियान प्रत्येक दिव्यांगांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
बच्चू कडूंना मंत्रिपदाचा दर्जा
दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आलाय. याबाबत शासनानं परिपत्रकही काढलं आहे.
आता मंत्रिपद मिळणार का?
शिंदे गटात महत्त्वाचं स्थान असलेल्या बच्चू कडू यांचा लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल असं सांगण्यात येत होतं. सत्तासंघर्षाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता जूनच्या पहिल्या आठवड्यात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यातच कडूंना आता महामडंळाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्यानं, त्यांना आता मंत्रिपद मिळणार का, की आता मंत्रिमंडळ विस्तारच पुढं जाणार, असा प्रश्न विचारण्यात येतोय.