‘रोहयो’च्या माध्यमातून प्रत्येक कुटुंब लखपती झाले पाहिजे : अप्पर मुख्य सचिव नंदकुमार

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना, मातोश्री पानंद रस्ते योजना तसेच इतरही अनेक प्रकारच्या योजना रोहयोच्या माध्यमातून राबविल्या जातात. त्या सर्व योजनांचा चांगल्या पद्धतीने लाभ घेऊन जामखेड तालुक्यातल्या शंभर टक्के कुटुंबांनी लखपती व्हावे, असा विश्वास रोहयो आणि जलसंधारण विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी व्यक्त केला.

    जामखेड : रोहयोमध्ये २६२ प्रकारच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना वैयक्तिक किंवा सार्वजनिक स्वरूपात देता येतो. या योजनांचा लाभ घेऊन मत्तानिर्मितीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला त्याचा आर्थिक फायदा झाला पाहिजे. या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब लखपती झाले पाहिजे, असे मत रोहयो आणि जलसंधारण विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार (Nandkumar) यांनी व्यक्त केला.
    जामखेड तालुक्यातील फक्राबाद व जामखेड याठिकाणी शेतकरी, महिला बचत गट, युवक, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या संवाद सभेत बोलत होते. यावेळी सभापती सूर्यकांत मोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, शितोळे, प्रशिक्षण समन्वयक निलेश घुगे, कर्जत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार योगेश चंद्रे, जामखेड गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, कर्जत गटविकास अधिकारी अमोल जाधव, कर्जत-जामखेडमधील सर्व अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
    फक्त अकुशल कामावर विसंबून न राहता मत्ता निर्मिती करणाऱ्या कुशल कामांना व वैयक्तिक लाभाच्या कामांनाही महत्त्व दिले गेले पाहिजे. सर्वात प्रथम १०० टक्के कुटुंब लखपती होऊ शकतात. हा विश्वास आपला मध्ये निर्माण व्हायला पाहिजे. माणूस हा स्वयंप्रेरणेने शिकत असतो. याच पद्धतीने जर आपण आत्मविश्वासाने समृद्धीसाठी काम केले तर सर्व कुटुंब पर्यायाने सर्व गावे, सर्व महाराष्ट्र समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.