माजी पोलीस अधिकाऱ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या, घातपाताचा कुटुंबियांना संशय!

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार टेमकर हे अनेक वर्षांपासून नैराश्याने त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हण्टलं जात आहे. या घटनेमागे कौटुंबिक वाद हे कारण असू शकते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, कुटुंबीयांनी या घटनेमागे कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

    मुंबई :  मुंबई पोलिस विभागातुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. निवृत्त एसीपी प्रदीप टेमकर यांनी सोमवारी मुंबईतील त्यांच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. वर्षीय टेमकर ( वय, 70 ) असं त्याचं नाव आहे. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. टेमकर आत्महत्या करण्यापूर्वी मद्यधुंद अवस्थेत होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मात्र, टेमकर यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मृत्यूमागे कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

     

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. माटुंगा पूर्व येथील देवधर रोडवर असलेल्या गंगा हेरिटेज नावाच्या निवासी इमारतीत ७० वर्षीय टेमकर पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. सोमवारी ते त्यांच्या राहत्या घरी एकटेच होते. त्यांनी सातव्या मजल्यावरील राहत्या घरातून उडी मारल्याचे सांगण्यात येत आहे.

    निवृत्त पोलीस अधिकारी टेमकर यांची शेवटची नियुक्ती 2014 मध्ये मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात झाली होती. तो नैराश्याने त्रस्त असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार टेमकर हे अनेक वर्षांपासून नैराश्याने त्रस्त होते. तो उदास राहत होते, त्यामुळे घरात भांडणे होऊ लागली. या घटनेमागे कौटुंबिक वाद हे कारण असू शकते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.