अतिव्यायाम ठरतो घातक; जाणून घ्या दुष्परिणाम

गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यास हृदयाला धोका पोहचू शकतो. हृदयगती वाढल्याने हृदयविकार जडू शकतो. हे टाळण्यासाठी शरीराला सोसेल इतकाच व्यायाम करा. तसेच जास्त वजनही उचलू नका.

  तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. मात्र हा व्यायामही प्रमाणातच करायला हवा. वजन कमी करण्यासाठी म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे म्हणा गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने नुकसानही होऊ शकते. तुम्हीही जास्त व्यायाम करताय का?

  – व्यायाम केल्यानंतर काही काळ अंग दुखते. या वेदना दोन-तीन दिवसांत कमी होतात. पण तुम्ही जास्त वजन उचलून व्यायाम करत असाल तर या वेदना दोन ते तीन महिनेही जाणवू शकतात. काही वेळा स्नायू आखडल्यामुळे ही समस्या निर्माण होते. जास्त व्यायाम केल्याने तुम्ही आजारीही पडू शकता. त्यामुळे आपला व्यायाम जास्त तर होत नाही ना याकडे लक्ष द्या.

  – शारीरिक मेहनतीमुळे शांत झोप येत असली तरी अतिव्यायामामुळे झोप उडूही शकते. जास्त व्यायाम केल्यानंतर बऱ्याच जणांना रात्री अस्वस्थ वाटते आणि झोप उडते.

  – गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यास हृदयाला धोका पोहचू शकतो. हृदयगती वाढल्याने हृदयविकार जडू शकतो. हे टाळण्यासाठी शरीराला सोसेल इतकाच व्यायाम करा. तसेच जास्त वजनही उचलू नका.

  हे सुद्धा वाचा

  – व्यायाम करताना शरीरातली ऊर्जा खर्च होते. मात्र अतिव्यायामामुळे जास्त ऊर्जा वापरली जाते. परिणामी तुमची रोगप्रतिकारकक्षमता कमी होऊ लागते. याच कारणामुळे तुम्ही वारंवार आजारीही पडता. सतत सर्दी, खोकला किंवा इतर समस्या निर्माण होत असतील तर अतिव्यायाम हे तर त्याचे कारण नाही एवढे जाणून घ्या.