उत्साह तर खूप होता पण खिशात होते फक्त 100 रुपये…व्हॅलेंटाइन डे निमित्त सिध्दार्थ चांदेकरनं शेयर केली गमतीशीर आठवण

अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकरची केमेस्ट्री चाहत्यांना फार आवडते. व्हॅलेंटाइन डे असं खूप थाटा माटात साजरा न करताही पार्टनरला छोट्या छोट्या गोष्टींमधून आंनद देणे हे महत्त्वाचं असल्याचं सिद्धार्थनं सांगितलं.

    मुंबई : अभिनेता सिध्दार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि अभिनेत्री मिताली मयेकरची (Mitali Mayekar) केमीस्ट्री चाहत्यांना फार आवडते. सिध्दार्थ आणि मितालीनं गेल्या वर्षी पुण्यातील ढेपेवाड्यामध्ये शाहीपध्दतीने लग्नगाठ बांधली. सिद्धार्थनं मिताली मयेकर सोबत सोशल मीडियावर नेहमी फोटो शेयर करत असतो. चाहत्यांनाही हे क्यूट कपल फार आवडतं. आज व्हॅलेंटाइन डे आहे या निमीत्तानं सिध्दार्थनं त्याच्या आयुष्यातील व्हॅलेंटाइन डे (Valantine’s Day) बद्दलच्या अनेक गमतीशीर आठवणी नवराष्ट्रशी संवाद साधत शेयर केल्या. यावेळी व्हॅलेंटाइन डे असं खूप थाटा माटात साजरा न करता पार्टनरला छोट्या छोट्या गोष्टींमधून आंनद देणं हे महत्त्वाचं असल्याचं सिद्धार्थनं सांगितलं.

     

    मितालीला सर्वात आधी कुठं भेटलास?

    आम्ही कोल्हापुरला एका इव्हेंट दरम्यान भेटलो. मी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होतो आणि ती तीच्या एका मालिकेचं प्रमोशन करायला आली होती. त्यानंतर आम्ही इन्स्टाग्राम वर बोलतो होतो मग आमच्याच चांगली मैत्री झाली त्यानंतर हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो.

     

    मितालीला पाहून असं वाटलं होतं कधी की हीच आपली लाईफ पार्टनर होणार?

    नाही, सुरुवातीला असं अजिबात वाटलं नाही. मैत्री झाल्यानंतर आम्ही नेहमी बोलत होतं कालांतराने तिचं बोलणं आवडू लागलं आणि मग मी तिच्या प्रेमात पडलो. त्यावेळी ठरवलं की मितालीला प्रपोज करायचं.

     

    आयुष्यात पहिल्यांदा डेटवर कधी गेला होता?

    मी कॅालेजमध्ये सर्वात आधी माझ्या गर्लफ्रेंडसोबत डेटवर गेलो होतो. त्यावेळी उत्साह खूप होता पण खिशात पैसे कमी होते. तिने ऑर्डर केलेली डिशच २५० ची होती पण माझ्या खिशात फक्त १०० रुपये होते. नशिबानं त्या हॅाटेलचा शेफ माझा मित्र निघाला. त्याला सत्य परिस्थिती सांगतल्यावर त्याने माझी मदत केली आणि मॅनेज केलं अशा पद्घतीनं माझी ती पहिली वहिली डेट फिस्टकटण्यापासून वाचली.

     

    व्हॅलेंटाइन डे चा तुझ्यासाठी काय अर्थ आहे?

    आमच्यासाठी व्हॅलेंटाइन डे हा आहे की पार्टनरसाठी छोट्या छोट्या गोष्टी करणं आणि आपल्या पार्टनरसाठी त्याच आवडता पदार्थ करणं असो की आपल्या नकळत घरच्यांना फोन करून त्यांची ख्याली खुशाली विचारणं.

     

    लग्नाआधीचा व्हॅलेंटाइन डे आणि लग्नानतंरचा व्हॅलेंटाइन डे यामध्ये काय फरक जाणवतो?

    फार काही फरक जाणवत नाही आहे. खरतरं आमच्या आयुष्यात व्हॅलेंटाइन डे ला फार काही महत्व नाही. एकमेकांना वेळ देणं, समजून घेणं सोबतचे ते क्षण सेलिब्रेच करणं हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही रोजचं एकमेंकाशी व्हॅलेंटाइन डे असल्यासारखं वागतो. एकमेंकाना स्पेशल असल्याची जाणीव करुन देतोय.

     

    मितालीला गीफ्ट द्यायचं असेल तर काय सुरुवातीला काय लक्षात येतं?

     

    मितालीला हिऱ्याची अंगठीची आवड आहे. आणि या अॅनिव्हर्सरीला तिला मी तेच देणार आहे.

     

    खरंच बायका कटकट करतात का? तुला काय वाटतं?

    खरंतर सगळे असं बोलतात की काय बायका सारख्या कटकट करतात. पण तसं खरतंर नाही आहे. त्यांना नीट समजून घेतलं आणि त्याचं बोलणं एकून घेतंल तर ते त्यांना फार आवडतं.