निफाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

निफाड, पिंपळगाव बसवंत तालुक्यातील काही भागांमध्ये रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांना फटका बसला असून इतर पिकांना देखील या पावसामुळे नुकसान झाले आहे.

    नाशिक : नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड, पिंपळगाव बसवंत तालुक्यातील काही भागांमध्ये रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांना फटका बसला असून इतर पिकांना देखील या पावसामुळे नुकसान झाले आहे.

    गुलाबी थंडीची चाहूल लागलेली असतानाच निफाडच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कधी थंडी तर कधी पाऊस आशा आस्मानी संकटांचा परत एकदा बळीराजाला फटका बसताना दिसत असून या पावसामुळे द्राक्ष बाग मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.