चक्क डॉक्टरनेच केला बलात्कार! लग्नाचे आमिष दाखवत केला अत्याचार आणि पैसेही उकळले; आरोपीला बेड्या

Mumbai crime : चक्क डॉक्टरनेच इन्स्टाग्रामवरून ओळख करीत अत्याचार केले आहेत. लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केले आणि नंतर पैसेही उकळले. आरोपी डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

    Mumbai Crime News : संबंधित डॉक्टर आरोपीवर या आधीही बलात्काराचे तीन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. इन्स्टाग्रामवरून (Instagram) ओळख झालेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) करणाऱ्या आरोपीला मालवणी पोलिसांनी (Malvani Police) अटक केली आहे.

    महिलेकडून घेतले सोनं

    सदरच्या आरोपीने या महिलेकडून सोनं आणि पैसेही उकळल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच याशिवाय इतरही महिलांशी त्याचे संबंध असून त्यांनाही लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याचे समोर आले आहे. योगेश सुनील भानुशाली (33 वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी व्यवसायाने डॉक्टर असून त्याच्या विरोधात आतापर्यंत बलात्काराचे तीन गुन्हे दाखल आहेत.

    तरुणींना लग्नाच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात
    आरोपी हा सोशल मीडियाच्या माध्यमातून (Instagram) तरुणींना लग्नाच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात ओढायचा. त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करून नंतर बलात्कार करून फोटो आणि व्हिडीओ काढायचा. त्यानंतर त्याचा वापर करून त्या तरुणींना ब्लॅकमेल करत होता. या तरुणींकडून आरोपीने पैसे आणि दागिणे उकळले होते.
    लग्नाच्या बहाण्याने बलात्कार
    पीडितेच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता जे समोर आले ते अतिशय धक्कादायक आहे. त्याने इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर या तरुणीशी मैत्री केली आणि त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने अनेकवेळा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्नास नकार दिला. अशा प्रकारे फसवणुकीचे आणि बलात्काराचे एक नव्हे तर तब्बल तीन गुन्हे आरोपी विरोधात दाखल करण्यात आले आहेत. सध्या मालवणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक करून अधिक तपास करत आहेत.

    इन्स्टाग्रामवरून झाली ओळख
    याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती पुढीलप्रमाणे, मालवणी पोलिसांना याबाबतची तक्रार 27 सप्टेंबर रोजी वर्ग करण्यात आली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित डॉक्टरला अटक केली. पोलीस कस्टडीमध्ये केलेल्या तपासामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या. आरोपीची आणि फिर्यादीची ओळखस ही इन्स्टाग्रामवर झाली होती. त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवले. तिच्याकडून पैसे आणि इतर सोन्याचे दागिणे उकळले.
    Mumbai Crime News : आणखी एका महिलेला जाळ्यात ओढलं
    या आरोपीने आणखी एका महिलेला त्याच्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलं. तिच्याकडूनही पैसे आणि दागिणे घेतले होते. आरोपीवर मालवणी पोलीस ठाण्यात 2020 मध्ये पोक्सो अंतर्गत एक गुन्हा दाखल आहे. त्यासंबंधित दोषारोप ठेवण्यात आला असून न्यायालयात त्याची सुनावणी सुरू आहे. मालवणी पोलीस याचा अधिकचा तपास करत आहेत.